Friday, August 21, 2026
Homeलोकार्पण सोहळामूल येथील अद्यावत सभागृहाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील अद्यावत सभागृहाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

image_pdfimage_print

आमदार मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द केला एक वर्षाच्या आत पूर्ण

मूल ( मेहुल मनियार )

मुल येथील प्रशासकीय भवनातील सभागृहाचे दिनांक 24.04.2026 ला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले, 2 मे 2025 ला सदर सभागृहात आढावा बैठक सुरू असताना इतका उकाडा जाणवला की उपस्थित जनता अक्षरशः होरपळून निघाली होती. सभागृहात बसने कठीण झाले होते , तेव्हा आमदार मुनगंटीवार यांनी लागलीच समस्त शेकडो जनतेसमोर सदर सभागृहाचे अद्यावतीकरण करण्यात येईल असे जाहीर केले. त्यांनी लागलीच जून 2025 ला 129.96 लक्ष रु मंजूर करत, प्रशासकीय मान्यता घेऊन एक वर्षाच्या आत अद्यावतीकरणं करवून घेत 24 एप्रिल ला लोकार्पण सुद्धा केले. सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करित जनतेच्या प्रश्नांचा आमदार मुनगंटीवार यांनी आढावा घेतला, प्रसंगी उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार श्रीमती मृदुला मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, ठाणेदार विजय राठोड, उपविभागीय अभियंता बोदेले, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, भाजप नेते नंदकिशोर रणदिवे, तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, सौ किरण कापगते, मनीषा गाडलेवार, नगरसेविका प्राची आक्केवार, अश्विनी निकोडे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!