Sunday, April 19, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025आपल्या नांवाने समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आपल्या नांवाने समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

भाजपा नेत्याच्या भेटीचे शोभाताईंनी केले खंडन

मूल :

       मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार किरण कापगते यांना भाजपाकडुन मिळालेल्या उमेदवारीचे खापर स्थानिक भाजपाच्या काही नेत्यांनी आपल्यावर फोडले असून शोभाताईंनीच किरण कापगते यांना उमेदवार मिळवुन दिली, ही चर्चा निरर्थक आहे. आजारपणा मूळे मागील काही दिवसांपासून विश्रांती घेत असून भेटीगाठीही बंद आहेत. त्यामूळे किरण कापगते हयांना उमेदवारी कोणाच्या माध्यमातुन मिळाली. याची मला कल्पना नाही. असे मत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.

 माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मूल येथील भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी आपल्या घरी येवून आपल्या प्रयत्नामुळे प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे आपण त्यांना आशिर्वाद देवुन प्रचार कार्यासाठी मदत करावी. अशी विनंती केली, यावेळी मी भाजपाची असून भाजपाचा प्रचार करेन, कोणत्या एकाचा प्रचार करणार नाही, कापगते यांना उमेदवारी कोणामुळे मिळाली याबद्दल मला माहिती नाही, आजारी असल्यामुळे मागील काही दिवसांपासून कोणालाही भेटलेली नसून कोणाच्याही उमेदवारी करीता कोणाही कडे प्रयत्न केलेले नाही. नवरगांव येथील सदानंद बोरकर तीन महिण्यापुवी नवरगांव येथील एका शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळयाच्या उद्घाटना करीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मागुन दयावी, यासाठी भेटून विनंती त्यांनी केली. तेव्हाच आपण मुख्यमंत्रयाशी संपर्क साधून सदानंद बोरकर यांचेशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यानंतर त्यांचेशी आपली कधीही भेट किंवा बोलणे झालेे नसल्याचे शोभाताई फडणवीस यांनी सांगीतले.

इंजि. शिवाणी आगडे यांना मूल नगर पालीकेची उमेदवारी जाहिर झाल्याची चर्चा सुरू असतांनाच एक दिवसापूर्वी प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी जाहिर झाली, प्रा. किरण कापगते यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी त्यांनी स्थानिक भाजपा नेत्या तथा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यामूळे यासर्व घडामोडी वरून आपल्या भेटीचा वेगळा अर्थ काढून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगीतले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!