Saturday, June 6, 2026
Homeअंतरविद्याशाखीय परिसंवाद15 मार्चला कर्मवीर महाविद्यालयात राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिसंवादाचे आयोजन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

15 मार्चला कर्मवीर महाविद्यालयात राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिसंवादाचे आयोजन

मूल ( मेहुल मनियार )
कर्मवीर महाविद्यालय मुल आणि प्रोग्रेसिव्ह टीचर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्त्री शिक्षण आणि संविधान या विषयावर आधारित या परिसंवादाचे उद्घाटन 15 मार्च ला कर्मवीर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10.30 वाजता प्रसिद्ध बालरोग तज्ञ, अभिलाषा गावतुरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एड. अनिल वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्घाटन सोहळ्याला प्रोग्रेसिव्ह टीचर्स फोरमच्या सहसचिव
डॉ. शिल्पा आठवले,  प्रोग्रेसिव्ह टीचर्स फोरम चे अध्यक्ष गजानन कोर्तलवार,सचिव शशिकांत धर्माधिकारी, उपाध्यक्ष एड. प्रणव वैरागडे, प्राचार्य अनिता वाळके यांची प्रमुख उपस्थिती लाभणारआहे. स्त्रीमुक्ती आणि संविधान या विषयाच्या वक्ता छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. मंजुश्री लांडगे हे राहणार आहेत.
दुपारच्या सत्रात 1 वाजता अहमदनगर येथील डॉ.श्रीकांत काळोखे यांचे शिक्षणातील धोरणात्मक बदल आणि संविधान तसेच वाशिम येथील प्रा. डॉ. मंगेश भुताडे यांचे शिक्षण हक्क….. आव्हाने आणि दिशा या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी 2.45 ते 3.30 वाजेपावेतो खुली चर्चा केली जाणार आहे. परिसंवाद कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान प्राचार्य डॉ. अनिता वाळके आणि प्रोग्रेसिव्ह टीचर्स फोरम यांनी केले आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!