Saturday, June 6, 2026
Homeगीत गायन स्पर्धाकर्मवीर महाविद्यालय, मूल येथे माजी खासदार स्व. वि. तू. नागपुरे स्मृती राज्यस्तरीय...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे माजी खासदार स्व. वि. तू. नागपुरे स्मृती राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.

मूल ( मेहुल मनियार )

     शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे माजी खासदार, दलित मित्र स्व. वि. तू. नागपुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी स्व. वि. तू. नागपुरे यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे सचिव शशिकांत धर्माधिकारी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे उपाध्यक्ष अड.प्रणव वैरागडे व विद्यार्थी मेळाव्याच्या संयोजिका व महाविद्यालाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके व महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर उपस्थित होते . या स्पर्धेचे परीक्षण अशोक येरमे व डॉ . गणेश गायकवाड यांनी केले.
सर्वप्रथम स्व.वि.तू.नागपुरे याच्या स्मृतीला अभिवादन करून प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धेच्या इतिहासाबाबत व आजपर्यंतच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी अड. प्रणव वैरागडे यांनी आपल्या वक्तव्यामधे देशभक्ती गीताच्या निमित्ताने मनामनांत उठणारे रोमांच व्यक्त केले.
या स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयातील तसेच राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, शहीदांचे बलिदान, राष्ट्रीय एकात्मता व देशप्रेम यांचा प्रभावी संदेश दिला. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज,वडसा च्या कु.पूनम नाकाडे हिने पटकाविला तर द्वितीय क्रमांक हायटेक कॉलेज ऑफ फार्मेसी, चंद्रपूर च्या  प्रज्वल मेश्राम यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात शशिकांतजी धर्माधिकारी यांनी अतिशय समर्पक व ऐतिहासिक दाखले देत राष्ट्रप्रेम व राष्ट्र समर्पण देशभक्ती गीतांतून कसे व्यक्त होते याचे विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. सागर मासिरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप मांडवगडे यांनी केले. आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी प्रतिनिधी व आयोजक समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे समापन राष्ट्रगीताने करण्यात आले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!