Wednesday, October 21, 2026
Homeपदग्रहण सोहळामी, एकता प्रशांत समर्थ,ईश्वर साक्ष्य शपथ घेते की......!!!
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मी, एकता प्रशांत समर्थ,ईश्वर साक्ष्य शपथ घेते की……!!!

image_pdfimage_print

मूल नगरपरिषदेत ऐतिहासिक पदग्रहण सोहळा

मूल

मूल नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली आहे. २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी तब्बल २०८१ मतांनी विजय मिळवला होता. तसेच २० पैकी १८ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते.

या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी २०२६ रोजी मूल नगरपरिषद परिसरातील भव्य प्रांगणात नगराध्यक्षा व १८ नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाचा मंगलारंभ करण्यात आला.यानंतर नगरपरिषदेच्या सर्व चल मालमत्तांची पूजा करण्यात आली. यामध्ये अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, कचरा संकलन गाड्या व इतर वाहने यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संचालन नगरपरिषदेचे अधीक्षक विनोद येनूरकर यांनी केले. प्रस्तावना व कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी मांडली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा एकता समर्थ व सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झालेले राकेश रत्नावार यांचेही स्वागत करण्यात आले.

नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी मूलच्या 13 व्या नगराध्यक्षा म्हणून तसेच थेट जनतेतून निवडून आलेल्या तिसऱ्या नगराध्यक्षा म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, मूल नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच पदग्रहण समारंभात अधिकृत शपथविधी पार पडला. हा क्षण मूलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.उपस्थित सर्व पदाधिकारी व नागरिकांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले.

नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी आपल्या भाषणात मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांना मूलभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, पारदर्शक कारभार, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

त्यानंतर नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी भाषण करताना हा विजय जनतेचा असल्याचे सांगितले. नगरपरिषद जनतेसाठी असून, कोणालाही अडचण येऊ नये, प्रत्येक समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.यानंतर नगरसेविका ललिता फुलझेले तसेच नगरसेवक अशोक येरमे यांनीही मनोगत व्यक्त केले.

काँग्रेस गटनेते राकेश रत्नावार यांनी आपल्या भाषणात हा सत्कार समारंभ जनतेला अर्पण करत असल्याचे सांगितले. विरोधक विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी, “विकास कसा करायचा हे आम्ही दाखवून देऊ,” असे त्यांनी विनोदी अंदाजात सांगितले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी यांना उद्देशून, “साहेब, आपली गाडी सुपरफास्ट आहे, तयार रहा,” असे म्हणत काँग्रेसचा जाहीरनामा पूर्णत्वास नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता रामटेके यांनी केले. कार्यक्रमानंतर नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी कार्यालयात जाऊन अधिकृतपणे कारभाराची सूत्रे स्वीकारली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!