Wednesday, October 21, 2026
Homeडायलिसिस केंद्रआचारसंहितेमुळे डायलीसिस सेंटर उद्घाटन सोहळा रद्द.... डायलिसिस सेंटर थेट रुग्णसेवेत सुरू
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आचारसंहितेमुळे डायलीसिस सेंटर उद्घाटन सोहळा रद्द…. डायलिसिस सेंटर थेट रुग्णसेवेत सुरू

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

      आदर्श आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर नियोजित डायलिसिस सेंटरचा उद्घाटन सोहळा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार नाही. मात्र, उद्घाटनाची औपचारिकता न करता हे डायलिसिस सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी दिनांक 25/09/2026 रोज शुक्रवार सकाळी 11.00 वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे.
मूल व  आजूबाजूच्या परिसरातील गरजू रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी दूरच्या शहरात जावे लागू नये, यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. म्हणूनच हा आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे.
आचारसंहितेमुळे उद्घाटन कार्यक्रम घेता आला नसला, तरी रुग्णसेवा थांबू नये, या भूमिकेतून सेंटर कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे परिसरातील रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे.
आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून उपलब्ध झालेली ही आरोग्य सुविधा मूल शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!