Saturday, June 13, 2026
Homeमाती आणि सूक्ष्मजीवसजीव माती : एक सूक्ष्मजैविक परिसंस्था.....वनस्पती रोगशास्त्र विभाग.. . डॉ. प्रविणा बरडे

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

सजीव माती : एक सूक्ष्मजैविक परिसंस्था…..वनस्पती रोगशास्त्र विभाग.. . डॉ. प्रविणा बरडे

मूल

शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारचे उपयुक्त विश्लेषण आणि माहिती मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या डॉ. प्रविणा सं.बरडे यांच्या लेखणीतून सादर…..

डॉ. विलास जी. अतकरे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय मूल यांच्या प्रेरणेतून व सहाय्यक प्राध्यापक डॉ. गितांशू टी. डिंकवार .यांच्या मार्गदर्शनाखाली….

माती आणि सुक्ष्मजीव या दोघांशिवाय  मृदावरणाचा टिकाव लागणे अशक्य आहे.

        माती अस सोनेरी मध्यम आहे,जिच्या पोटात बी टाकल्यास ते उगवणार नाही अस होऊच शकत नाही, तीला निसर्गाची अदभूत निर्मिती अशी उपमा दिल्यास वावग वाटणार नाही. निसर्गाच्या हालचालींनी जसे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी इत्यादी मुळे तिच्या गाभार्यात बहुसंख्य जीवाश्म पुरल्या गेलेत. या नैसर्गिक बाबींमुळे बहुतेक वेळा नविन खनिज रुपी माती तयार होण्यासाठी चालना मिळते, पण नैसर्गिक रित्या नवीन माती तयार होण्यास हजारो-लाखो वर्ष जातात.

जर या मध्ये सूक्ष्म जीवांचा हातभार लागला तर ती कृती लवकर होण्यास मदत होते, जसे जीवाणूं, विविध बुरशी, कीटक, सुत्रकृमी इ. विघटन करण्यास चालना देतात. बऱ्याचदा  जमिनीच्या पृष्ठ भागावर पडलेल्या झाडझुडपांचे अवशेष, मरून पडलेली जनावर, आणखीही बरीच घटक नैसर्गिक रित्या सडू शकतात, अशी जैविक संसाधन हे सूक्ष्म जीवांसाठी खाद्यान्न   चा साठा असतो, यात मातीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जसे, माती त्यांना विघटन प्रक्रियेसाठी जागा, ओलावा आणि विविध खनिज पुरवते. सरते शेवटी सर्व कुजण्याच्या प्रकियेत जो पदार्थ किवा घटक बाहेर पडतो, त्यास आपण हुयमस किवा पोषक तत्वांनी युक्त असे सेंद्रिय खत म्हणू शकतो.त्या व्यतिरिक जीवाणूं जसे (रायझोबियम, अझाटोबॅक्टर, बैजरिंकीया, क्लोस्ट्रिडियम, ऍझोस्पिरिलीम) आणि विविध बुरशी जसे (अर्बुसकलर म्हैकॉर्रिझा बुरशी-VAM) नत्राचे, स्पुरदाचे (अर्बुसकलर म्हैकॉर्रिझा बुरशी, पेनिसिलिम, अस्पेरजीलस, बॅसिलस, सुडोमोनास जिवाणू) आणि पालाशाचे स्थिरीकरण (बुरखोलडेराया, पाइनबॅसिलस) करण्यात मदत करतात, आता नत्र, स्फुरद आणि पालाश च का ? तर हे अत्यंत महत्वाचे तीन पोषक घटक आहे, जे आवश्यक जैविक कार्ये, रचनात्मक विकास आणि एकूणच जगण्यासाठी आवश्यक असतात, जे वनस्पती तयार करू शकत नाहीत. इतर जीवाना पौष्टिक घटकांची गरज असली, तरी वनस्पती प्रकाश्संलेषण, मुळाची वाढ आणि चयापचय प्रकिया चालवण्यासाठी या विशिष्ट खनिज घटकांवर अवलंबून असतात.

मातीचा आणि सूक्ष्मजीवांचा संबंध काय ? तर जिथे झाडाची मुळे आली तिथे मातीमध्ये झाडा च्या मुळांमार्फत मुळांच्या आसपासच्या मातीच्या भागात मुल उत्सर्ग जसे सेंद्रिय आम्ले, सरकरा आणि कर्बोदके, अमिनो आम्ले, विकरे, दुय्यम चयापचय उत्सर्जित होत असतात. हे पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्याच बरोबर वनस्पतीला निरोगी ठेवण्यास मदत करतात. दरम्यान होणारा स्त्राव, हा सुद्धा बऱ्याचदा इतर परोपजीवी सूक्ष्म जीवना आकर्षित करतो, त्याने होत अस कि मुळा जवळील माती मध्ये सुक्षजीवांचे प्रमाण अन्य कुठल्याही ठिकाणापेक्षा जास्त असते. मृतोपजीवी किवा शावोपजीवी व्यतिरिक्त.

     यामुळे असे होते की, मातीच्या कणांची हालचाल होते, घट्टपणा नष्ट होतो, जमीन भुसभुशीत होते सुपीकता वाढते, याने शाश्वत वनस्पती वाढीसाठी चालना मिळते. या व्यतिरिक अत्यंत महत्वाच म्हणजे मुलपरीवेशात रोगकारक बुरशी, जीवाणू, सुत्रकृमी सोबत जसे (फुसरियम, पिथियम, फयटोफथोरा, रेल्स्टोनिया, मेलडोगायने इकॉग्नीत) किवा इतरही उपयुक्त बुरशी जसे (म्हैकॉरिझा, त्रिकोडर्मा) आणि जीवाणू जसे (बॅसिलस, सुडोमोनास, निट्रोसोमोनास) वाढतात, ज्याने नैसर्गिक पद्धतीने रोग नियंत्रण होण्यास मदत होते.

 माती आणि सूक्ष्मजीव यांचा समतोल साधण्यासाठी घ्यावयाची काळजी….

१) अतिरेकी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा,

२) विघटनशील घटक अधिकाधिक जमिनीस कसे पुरवता येतील याचे नियोजन करावे,

३) जमिनीत अति प्रमाणात ओलावा / कोरडेपणा निर्माण होईल अशी परिस्थिती टाळावी.

४) जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके, खते यांचा अधिकाधिक वापर वाढवावा,

५) लागवडीखालील क्षेत्र वगळता इतर ठिकाणी जमिनीत पाणी धरून ठेवणारी झाडे लावावी जसे वड, बाभूळ, पिंपळ, कडुनिंब, बसवूड, वॉटर ट्री इ.

 

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!