Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025प्रभाग क्रमांक 3 मधून नितीन गद्देवारांचा सर्वोत्कृष्ट विजय : "उपाध्यक्षपद" ही जनतेची...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रभाग क्रमांक 3 मधून नितीन गद्देवारांचा सर्वोत्कृष्ट विजय : “उपाध्यक्षपद” ही जनतेची भावना

image_pdfimage_print

मूल

नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षासह 20 पैकी 18 नगरसेवक जिंकून ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. त्यात प्रभाग क्रमांक 3 हा संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला आहे. या प्रभागातून काँग्रेसकडून नितीन गद्देवार यांनी मिळवलेला विजय केवळ निवडणूक निकालापुरता मर्यादित नसून,तो जनतेच्या विश्वासाचा आणि त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा ठोस पुरावा मानला जात आहे.4 अत्यंत बलाढ्य आणि प्रभावी विरोधी उमेदवार रिंगणात असतानाही नितीन यांनी 543 अशा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा विक्रम नोंदवत राजकीय जाणकारांनाही आश्चर्यचकित केले आहे.

या विजयामागे नितीन गद्देवार यांचा सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, तसेच प्रचारादरम्यान मांडलेली विकासाची स्पष्ट भूमिका महत्त्वाची ठरली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगार व युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी थेट संवाद साधत नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे प्रभाग 3 मधील मतदारांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत नितीन यांच्या पारड्यात कौल टाकला.

या पार्श्वभूमीवर आता प्रभाग 3 मधील मतदारांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे—इतक्या मोठ्या आणि निर्णायक विजयाचे ‘राजकीय गिफ्ट’ म्हणून नितीन यांना नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर बसवले पाहिजे. मतदारांचे स्पष्ट मत आहे की, ज्या उमेदवाराने पक्षासाठी कठीण लढत जिंकली, चार ताकदवान प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले, त्याला जबाबदारीचे आणि सन्मानाचे पद देणे हे पक्षाच्या हिताचे आहे.

स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांचे म्हणणे आहे की, चांगली कामगिरी करूनही योग्य पद न मिळाल्यास कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो आणि पक्षाबाबत नाराजी निर्माण होऊ शकते. “काम करणाऱ्याला पद, उत्कृष्ट निकाल देणाऱ्याला मान” हे सूत्र अमलात आणले गेले पाहिजे, अशी ठाम भूमिका मतदार मांडत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व प्रभाग क्रमांक 4 चे काँग्रेस उमेदवार राकेश रत्नावार यांची गटनेते पदावर वर्णी लागली आहे. तथापि, नितीन गद्देवार यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी स्वाभाविक दावेदार म्हणून घेतले जात आहे. आता पक्ष नेतृत्व आणि नगरपरिषदेतील वरिष्ठ नेते या जनभावनेची दखल घेऊन काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण मूल शहराचे लक्ष लागले आहे.

हा प्रश्न केवळ एका पदाचा नसून, तो पक्षातील न्याय, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेच्या विश्वासाला किती महत्त्व दिले जाते, याची कसोटी ठरणार आहे. प्रभाग 3 चा कौल स्पष्ट आहे;दणदणीत विजय मिळवणाऱ्यालाच मोठी जबाबदारी द्या.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!