Saturday, August 22, 2026
Homeबिज प्रक्रिया प्रदर्शनमुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया बद्दल माहिती दिली
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया बद्दल माहिती दिली

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यावर प्रक्रिया केल्यास बियाण्याचे उगवण चांगले होते रोग व किडीपासून संरक्षण मिळवून उत्पादन वाढण्यासाठी मदत मिळते ही उपयुक्त माहिती देण्याच्या हेतूने मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव( RAWE) या उपक्रमा अंतर्गत 16 जून 2026 रोजी राजगड येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालयाच्या कु.शुभांगी बिसेन, कु. पीपल बनकर, कु. राणी बांते, कु. रुनाली भांडारकर आणि कु. नेहा भोयर या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य प्रक्रिया केलीच पाहिजे, यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, बियाण्यांची उगवण चांगली होते, रोपे निरोगी व जोमदार वाढतात आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. त्यांनी पुढे सांगितले की प्रमाणित व निरोगी बियाण्यांची निवड केली पाहिजे. शिफाशीनुसार बुरशीनाशक किंवा जैविक घटकांचा वापर केला पाहिजे, तसेच औषधाचे योग्य प्रमाण घेऊन बियाण्यांवर एक सारखे लावले पाहिजे, असे नमूद केले.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वि. जी. अतकरे यांच्या प्रेरणेतून समन्वयक डॉ.आर.पी. गजभिये व प्रा. नागेश नवघरे, डॉ . मुन्नरवार आणि डॉ . अक्षय इंगोले यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. राजगडच्या अमोल ठाकूर आणि इतर शेतकऱ्यांनी उत्तम माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!