Friday, August 21, 2026
Homeमार्गदर्शन कार्यक्रमविद्यार्थिनींनी स्वतःला कमजोर न समजता मेहनतीने जीवनात यश मिळवण्याचा प्रयत्न करा.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

विद्यार्थिनींनी स्वतःला कमजोर न समजता मेहनतीने जीवनात यश मिळवण्याचा प्रयत्न करा.

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

       पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाद्वारे विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन या विषयावर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार व सेवानिवृत्त प्रा.चंद्रकांत मणियार उपस्थित होते.मंचावर उद्यान विद्या विभागाचे प्रा. डॉ. रमाकांत गजभिये यांची विशेष उपस्थिती होती.
प्रा. मनियार यांनी आपल्या मार्गदर्शनातून सध्याच्या परिस्थितीत मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकरणाबाबत माहिती देतांना उपस्थित विद्यार्थिनींना काळजी घेण्याबद्दल आवाहन केले. आपल्या आई-वडिलांचा विश्वास गमावला जाणार नाही, याबाबत विद्यार्थिनींनी काळजी घेणे गरजेचे आहे हे सांगताना,  कुठल्याही आमिषाला बळी न पडता सकारात्मक विचार ठेवून आपले कार्य करावे, असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही आणि आपल्या जीवनात कुठलीही अडचण येणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात चांगले आणि वाईट काय आहे हे जाणून पाऊल टाकले पाहिजे. आजच्या परिस्थितीत मुलींनी सर्व क्षेत्रात पदार्पण करून यश प्राप्त केले आहे. विद्यार्थिनींनी जीवनात उत्तम प्रगती साधावी आणि यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. महाविद्यालय तर्फे प्रा. मणियार यांचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबाबत माहिती देताना विद्यार्थिनींनी समाजात वावरताना स्वतःची काळजी घ्यावी असे नमूद केले. महाविद्यालय प्रशासनातर्फे सुद्धा विद्यार्थिनींची विशेष काळजी घेतली जात आहे याबाबत सुद्धा सांगितले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय प्रशासन सतत झटत असते,याचा त्यांनी उल्लेख केला.
या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन वनस्पती रोग शास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. गीतांशू डिंकवार यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!