Saturday, August 22, 2026
Homeकृषि सप्ताहकृषी महाविद्यालय मुल तर्फे कृषि सप्ताहाचा समारोप... सातव्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय मुल तर्फे कृषि सप्ताहाचा समारोप… सातव्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

image_pdfimage_print

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने १ ते ७ जुलै हा कालावधी कृषि सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला असून, विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याअनुषंगाने कृषि महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  शिंदेवाही तालुक्यातील मौजा किन्ही येथे कृषि सप्ताहाच्या सातव्या दिवशी कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन विविध पिके व कृषिपूरक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि सप्ताह यशस्वीपणे राबविण्यासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. पहिल्या पथकामध्ये डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या), डॉ. भूषण ठाकरे (किटकशास्त्र), डॉ. प्रवीण घुबे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), श्री. देवानंद कुसुंबे (कृषिविद्या), श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण), श्री. नागेश नवघरे (मृद विज्ञान), डॉ. सुवर्णा नगराळे (वनस्पतीशास्त्र), डॉ. कांचन गेडाम (कृषि अभियांत्रिकी) यांचा समावेश होता.

      तर दुसऱ्या पथकामध्ये डॉ. शैलेंद्र कडू (उद्यानविद्या), श्री. शाम पतिंगे (वनस्पतीशास्त्र), डॉ. गीतांशु डिंकवार (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. स्वप्नील ठाकरे (कृषिविद्या), डॉ. अक्षय इंगोले (मृद विज्ञान) डॉ. अमरदीप डेरे (कृषि अभियांत्रिकी) व डॉ. आशिष लाडे (कृषि विस्तार शिक्षण) यांचा समावेश होता.

या दोन्ही पथकांनी कृषि सप्ताहा दरम्यान विविध गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देऊन धान, कापूस, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, खत व पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कृषि पूरक व्यवसाय, नैसर्गिक शेती तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्या समस्यांवर योग्य उपाययोजना सुचविण्यात आल्या. कृषि सप्ताहांतर्गत राजगड, पळसगाव (जाट), कनेरी, भेजगाव, मारोडा, मरेगाव, लोनवाही, बेलगाटा आणि किन्ही या नऊ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देऊन सुपीक व समृद्ध खरीप हंगाम होण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर सातव्या दिवशी कृषि महाविद्यालयाचे डॉ. शैलेंद्र कडू, सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या), डॉ. भूषण ठाकरे (किटकशास्त्र), श्री. देवानंद कुसुंबे (कृषिविद्या), श्री. अजय उईके (कृषि विस्तार शिक्षण), डॉ. सुवर्णा नगराळे (वनस्पतीशास्त्र) आणि डॉ. कांचन गेडाम (कृषि अभियांत्रिकी) यांनी धान, कापूस, आंबा, चिकू तसेच चंदन लागवडीसह विविध कृषिपूरक विषयांवर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनादरम्यान धान व कापूस पिकातील सुधारित लागवड तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर, तण, कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, हवामानानुसार शेती नियोजन तसेच उत्पादन खर्च कमी करून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगण्यात आले. यावेळी आंबा फळबाग व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला. दशेरी, केसर, हापूस, चौसा, लंगडा, नीलम आणि आम्रपाली या आंबा वाणांची वैशिष्ट्ये, योग्य लागवड अंतर, सिंचन व्यवस्थापन, छाटणी, फळधारणा वाढविण्याच्या तंत्रज्ञानासह कीड व रोग व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच चिकू लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी आवश्यक व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या दृष्टीने या फळपिकाचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, शेतीत दीर्घकालीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी चंदन, बांबू व इतर वनाधारित वृक्षपिकांची लागवड करण्याचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. कृषिवनीकरण (Agroforestry) पद्धतीचा अवलंब करून शेतीसोबत वृक्ष लागवड केल्यास मृदासंवर्धन, पर्यावरण संरक्षण, अतिरिक्त उत्पन्नाची निर्मिती तसेच हवामान बदलाच्या आव्हानांशी प्रभावीपणे जुळवून घेण्यास मदत होते, असे कृषि शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितले. कृषि सप्ताहाच्या विविध उपक्रमांची प्रसारमाध्यमे व डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मद्वारे प्रभावी प्रसिद्धी करण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. देवानंद कुसूंबे सहायक प्राध्यापक (कृषिविद्या) आणि श्री. अजय उइके सहायक प्राध्यापक (कृषि विस्तार शिक्षण) यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कृषि सप्ताहातील विविध कार्यक्रम, शेतकरी मार्गदर्शन उपक्रम आणि कृषि तंत्रज्ञानाची माहिती व्यापक स्तरावर शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. कृषि सप्ताह अंतर्गत कृषि महाविद्यालय, मुल यांच्या विविध उपक्रमांना शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) विद्यार्थी, विद्यार्थिनी व कृषि शास्त्रज्ञांचे मनापासून कौतुक केले. सदर उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे  यांनी दोन्ही पथकांचे अभिनंदन केले.

 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!