Wednesday, October 21, 2026
Homeसामाजिक उपक्रमधडाक्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम! दीपक गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त मुलमध्ये विनामूल्य शवपेटी सुविधा उपलब्ध
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

धडाक्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम! दीपक गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त मुलमध्ये विनामूल्य शवपेटी सुविधा उपलब्ध

image_pdfimage_print

मुल

‘समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा‘ हा विचार कृतीत आणत, मुल शहरातील श्री साई भक्तांनी एका अत्यंत संवेदनशील आणि समाजोपयोगी उपक्रमाची सुरुवात केली आहे. शहरातील प्रसिद्ध नागरिक दीपक ईश्वरजी गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त, मुलवासीयांसाठी संपूर्णपणे विनामूल्य शवपेटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यास, ऐनवेळी अंत्यविधी व शवपेटीची व्यवस्था करताना मोठी आर्थिक आणि मानसिक ओढाताण होते. अशा अत्यंत गरजेच्या वेळी ही सेवा गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत साई भक्तांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे.श्री साई मंदिर, बाजार समिती परिसर, मुल येथे उपलब्ध असलेली ही सेवा गरजू नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत आणि वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल.

​आजकाल वाढदिवसावर केला जाणारा अनावश्यक खर्च टाळून, समाजाला कायमस्वरूपी उपयोगी पडेल असा उपक्रम राबवून दीपक गोयल आणि साई भक्तांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. या प्रेरणादायी आणि संवेदनशील कार्याबद्दल संपूर्ण मुल शहरातून साई भक्तांचे व देणगीदारांचे भरभरून कौतुक होत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!