Wednesday, October 21, 2026
Homeवाढदिवसनामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस खेळाडू विद्यार्थ्यांना टी-शर्ट व शैक्षणिक साहित्य, स्पर्धा...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस खेळाडू विद्यार्थ्यांना टी-शर्ट व शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक भेट देऊन साजरा.

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांचा वाढदिवस दिनांक 15 आक्टोंबर 2026 ला चिमढा येथील ग्रामपंचायत पटांगणात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पुस्तके व खेळाडूंना टी-शर्ट भेट देऊन, मिठाई वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खेळामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व नियमांचे पालन आणि शिस्त शिकायला मिळते .मन आनंदी राहतो आणि आत्मविश्वास वाढतो, या हेतूने विद्यार्थी खेळाडूंना टी-शर्ट चे वितरण करण्यात आले, यासोबतच वाचनाची व अभ्यासाची सवय लागावी यासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले .अनोख्या उपक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले व त्यांच्या सहचारिणी सौ. सीमाताई लोनबले यांनी केले. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचन संस्कृती ला चालना मिळावी व ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने स्वखर्चाने साहित्य वितरित करण्यात आले.
डोंगरगाव येथील सत्यशोधक वाचनालयात अनेक शालेय विद्यार्थी अभ्यास करीत असतात करीत असतात,युवक व युवती विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.


या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत विद्यार्थी असूनही स्पर्धा परीक्षांमध्ये टिकण्यासाठी योग्य मार्गदर्शन व पुस्तकाचा साठा असणे गरजेचे असते, ही बाब लक्षात घेऊन प्रा. लोनबले व सेवानिवृत्त उपायुक्त किरण गावतुरे यांनी भुजबळ साहेबांचा वाढदिवस वाचन संस्कृतीला चालना देणारा ठरावा व ग्रामीण विद्यार्थी शासकीय नोकरीत यावे यासाठी वाचनालयाला विविध स्पर्धा परीक्षेचे भेट देऊन व इतर विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके तसेच रजिस्टर व पेन वितरित करण्यात आली. ग्रामीण भागातील गावाबद्दल प्रेम व आस्था आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त विक्री व सेवा कर उपायुक्त किरण गावतुरे,महासचिव प्रा. गंगाधर कुंनघाडकर सरपंच श्री. कालिदास खोब्रागडे, उपसरपंच श्री. योगेश लेनगुरे, धनगर समाजाचे अध्यक्ष, पत्रकार नितेश मॅकलवार,मुल स्वराज्य पतसंस्थेचे श्री. संदीप मोरे, एल्गार अकॅडमी चे श्री. किशोर राऊत, समता परिषदेचे श्री. वासुदेव नागोसे, माजी उपसरपंच भारत वाळके, सदस्य श्री. विनोद मांदाळे, श्री. प्रवीण लोनबले, श्री
विजय शेंडे, सुरेश निकुरे श्री. प्रज्वल लोनबले तसेच डोंगरगाव येथील कार्यक्रमात माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करून माननीय भुजबळ साहेबांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी समता परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष श्री. गुलाब शेंडे, श्री किरण पोरेड्डीवार, श्री. विनोद वेटे, श्री.सुधीर शेंडे श्री. भाग्यवान मोहुलें श्री. गिरीधर चौधरी श्री. साईनाथ ठाकरे श्री.जगदीश शेंडे व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक ,युवती व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. चिमढा येथील कार्यक्रमाचे संचालन कु. भूमिका बोळण लोनबले , तर डोंगरगाव येथील कार्यक्रमाचे संचालन श्री.
विनोद ठाकरे यांनी केले, याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!