Wednesday, October 21, 2026
Homeवाढदिवसआमदार डॉ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमा द्वारे उत्साहात...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आमदार डॉ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमा द्वारे उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकनेते, आमदार तथा माजी मंत्री डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या सौ. हर्षा खरासे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्राचार्य व प्राध्यापकांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले. तसेच डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख, दूरदृष्टीच्या आणि जनकल्याणासाठी समर्पित राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा सादर करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती देत विद्यार्थिनींना समाजसेवेची प्रेरणा देण्यात आली.

       त्याच प्रमाणे जिल्हा परिषद शाळा, गांधी चौक, मूल येथे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले. हा उपक्रम मुख्याध्यापक. महेश रामटेके व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.  जिल्हा परिषद शाळा, विहीरगाव (ता. मूल) येथेही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका कु. कविता सोनुले यांनी मोलाचे सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी श्री माता कन्याका सेवा संस्था, चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. सुदेशकुमार कापर्ती तसेच सचिव श्री. राजेश्वर सुरावार यांनी शुभेच्छा देत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!