Thursday, August 20, 2026
Homeस्वच्छता अभियानकृषी महाविद्यालय मूल तर्फे स्वच्छता पंधरवडा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय मूल तर्फे स्वच्छता पंधरवडा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, मूल येथे युवक कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या निर्देशानुसार दिनांक १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. या कालावधीत महाविद्यालयामार्फत स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात आले.


या उपक्रमाची सुरुवात दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाने करण्यात आली. महाविद्यालयातील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषि शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ‘माय भारत’ पोर्टलद्वारे अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात डिजिटल प्रतिज्ञा घेतली व प्रमाणपत्रे डाउनलोड केली. या उपक्रमात एकूण १३१ विद्यार्थी व २२ कर्मचारी सहभागी झाले. दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाइन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या थेट संबोधनात सहभागी होऊन व्यसनमुक्त समाजनिर्मिती आणि राष्ट्राच्या विकासात युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले. दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, युनिट मूल यांच्या सहकार्याने ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाजनजागृती मोहिमे’अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ६ व १३ ऑगस्ट २०२६ रोजी मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत महाविद्यालय परिसर, विभागीय प्रयोगशाळा, ग्रंथालय, पोर्च व वर्गखोल्यांची स्वच्छता करण्यात आली. दिनांक १३ ऑगस्ट रोजी स्वच्छतेसोबत वृक्षारोपणही करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्यात आली.


दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) युनिटच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ रॅली व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयापासून नगर परिषदपर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. रॅलीनंतर नगर परिषद परिसर तसेच स्थानिक बाजारपेठेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कृषि महाविद्यालय, मूल येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. अशा प्रकारे स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी याबाबत जनजागृती करण्यात आली.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!