Sunday, April 19, 2026
Homeसंविधान दिवसनवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा केला

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा केला

मूल

आज दि.  26 नोव्हेंबर 2025 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थांची शाळा परिसरातून गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषवाक्य सह रॅली काढण्यात आली. नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात अतिथी म्हणून तालुका समन्वयक डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे,चे उपेंद्र वनकर, पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, जेष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे जेष्ठ शिक्षक विजय मेश्राम यांनी केले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी संविधान या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री उपेंद्र वनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो, असे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक अशोक झाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विध्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व सांगितले. तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी भक्ती मारकवार, लक्ष्मी कवाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु.गाथा निमगडे हिने मानले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक विकास मोडक, निलेश माथनकर, विजय निखारे, भारत सलाम, राजू बोढे, चैतन्य पुप्पलवार, सुनील चौधरी, ताराचंद निमसरकर, पुनमचंद वाळके, उदयचंद्र चौधरी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!