Saturday, June 13, 2026
Homeबस स्थानक निरीक्षणहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत समिती द्वारा मूल बस...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत समिती द्वारा मूल बस स्थानक चे झाले निरीक्षण.

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे तिसरे मूल्यांकन करण्यात आले.

प्रादेशिक मूल्यांकन समिती मध्ये अमरावती येथील प्रादेशिक व्यवस्थापक रोहन भानुदास पलंगे,  वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी राकेश सुरेश पवार, लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी प्रा. चंद्रकांत मनियार, जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भप्रांत अध्यक्ष व प्रवासी संघाचे दीपक देशपांडे, या चार सदस्यीय समितीने मूलच्या बसस्थानकाची पाहणी केली.


या अभियानात ‘अ’ वर्गातील बसस्थानकाचे चार वेळा मूल्यांकन होणार असून आजचे तिसरे मुल्यांकन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला एक करोड रुपयांचे बक्षीस तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत दिवसेंदिवस अधिकाधिक चुरस निर्माण झाली आहे.


मूल बसस्थानकाचे मूल्यांकन करताना समितीतर्फे बसस्थानक वरील स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, दिशादर्शक सुचनाफलक, परिसर स्वच्छता, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरीनिहाय गावाचे फलकांचे निरीक्षण केले. बसस्थानकावरील चौकशी खिडकीच्या बाजूला वेळापत्रक, उद्घोषणा यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी, सूचना संबंधित बसस्थानकासह आगार व आगार व्यवस्थापकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, चालक व वाहकांचे विश्रांतीगृह, बसस्थानकावरील चौकशी, आरक्षण सोयीसुविधा, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, वाणिज्य आस्थापना आणि पार्किंग व्यवस्थेबद्दल समिती द्वारे निरीक्षण करण्यात आले.
बसस्थानक अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असावे यासाठी स्थानिक पातळीवर महामंडळाचे कर्मचारी, व जनता सहकार्य करीत असल्याचे परिक्षण समितीला दिसून आले. प्रशासनाला प्रवाशांची साथ लाभली तर आपले बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहील आणि ते स्पर्धेत अव्वल स्थानावर सुद्धा पोहोचू शकेल अशी अपेक्षा मुल्यांकन समितीचे वतीने व्यक्त केली गेली आहे.
या परिक्षणाचे वेळी परिवहन महामंडळाचे चंद्रपूर आगारातील खाडिलकर, प्रांजली थोटे, हेमंत गोवर्धन, वाडीकर सह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!