कृषी महाविद्यालय ,मुलचा : उपक्रम. कृषी सप्ताहाचे आयोजन.
मुल ( प्रा.चंद्रकांत मनियार )
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) या कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे मौजे कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली येथे कृषी महाविद्यालय, मुल येथील कृषी दुतान मार्फत १ जुलै रोजी कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने १ ते ७जुलै हा कालावधी कृषि सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला असून, विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने कृषि महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी.अतकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा. कनेरी ,ता. जि. गडचिरोली येथे कृषि सप्ताहाच्या निमित्ताने कृषीदूतांनमार्फत शेतकऱ्यांना शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीबद्दल विविध कल्याणकारी योजना, शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, फळ बागलागवड, शेतीपूरक व्यवसाय, पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन, अशा अनेक विषयांवरती प्रत्येकी सातही दिवशी कृषि दुतान मार्फत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील बांधावर भेटी देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करून विषायाणुरूप योग्य ती चर्चा व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
१ जुलै – एक जुलै रोजी कृषी दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात कनेरी गावातील ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला व या कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालय मुल, कृषी संशोधन केंद्र सोनापूर ,कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने झाली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली येथील उद्यानविद्या विभागाचे कृषी तज्ज्ञ डॉ. सूचित लाकडे होते, तर उद्घाटक म्हणून कणेरीचे सरपंच श्री. तुषार मडावी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी व कृषी विस्तारशाखा विषय तज्ञ डॉ.आशिष लाडे , व कृषी अभियांत्रिकी विषय तज्ञ डॉ. अमरदीप डेरे, तसेच कृषी महाविद्यालय सोनापूर येथील उद्यानविद्या विभाग विषयतज्ञ प्रणाली भैसारे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रशेखर जक्कनवार , श्री. नेताजी लोंडे, श्री. शामजी कोलते, श्री. प्रभाकर लाकडे, पोलीस पाटील श्री. गणेशजी मडावी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कनेरी येथील मुख्याध्यापक श्री. युवराज मांडले उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीदूत विद्यार्थी अथर्व डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गुरुदेव आसोले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विषय तज्ञ व शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या थेट शेतातील बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

३-जुलै: फळझाड लागवडीकरिता खड्डा खान्नने आणि माती भरणे या विषयाचे प्रात्यक्षिक.( Digging and pit filling) .
फळझाड लागवडीसाठी प्रथमतहा खड्डा व्यवस्थित चौरस आकारात १×१×१ M मि खानने व त्यानंतर सेंद्रिय खते (शेणखत ,गांडूळ खत)तसेच बुरशीनाशकाचा वापर करत त्यामध्ये वाळलेला पालापाचोळा व काळी माती टाकून खड्डा भरून घ्यावा व फळझाड व्यवस्थित मधोमध काठीचा आधार देऊन लावण्यात यावे.
४-जुलै: बीज प्रक्रिया व त्याचे महत्त्व
(Seed treatment)
कृषीदूतानमार्फत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया ही का करावी व तिचे महत्त्व काय आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. कृषीवतांनी विविध माध्यमातून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करून दाखवली व ती केल्याने त्याचे होणारे असे अगणित फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले. जसे की बियांची शुद्धता कळते व बियांना संरक्षण ,कीड व रोगांपासून आणि मुख्यतःउत्पादनात भरघोस अशी वाढ होते.
५-जुलै: शेतकऱ्यांसाठी शेतीबद्दल अशा विविध कल्याणकारी योजना व कृषी माहिती सादरीकरण.
(Formation of information corner).
शेतकऱ्यांना कृषी बद्दल माहितीसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जसे की सौर ऊर्जा प्रकल्प, मागेल त्याला शेततळे, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय, शेळी व बकरी पालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन , व मत्स्य पालन अशा अनेक कृषी माहिती यांचे कृषिदुतांनी सादरीकरण व स्पष्टीकरण करण्यात आले .
६-जुलै: कृषी जागरूकता कृती शालेय विद्यार्थ्यांमध्ये आयोजित करण्यात आली.
(Agricultural awareness activity in school students)
शालेय विद्यार्थ्यांमध्ये कृषी विषयाची जागृती व ओढ निर्माण व्हावी यासाठी कृषिदुतांनी शालेय स्तरांवर विद्यार्थ्यांना मध्ये कृषीची जागृती केली व त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध कृषीची माहिती व ज्ञान देण्यात आले.
आणि त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांमध्ये कृषी बद्दलचा दृष्टिकोन हा सकारात्मक केला व कृषी विषयाबद्दल जागृती करून कृषी बद्दलचे महत्त्व पटवून विद्यार्थ्यांमध्ये देण्यात आले.
७-जुलै: बोर्डो पेस्ट निर्मिती व प्रत्यक्ष उपयोग
(Bordeaux paste preparation and its uses)
कृषी दुतांनी शेतकऱ्यांच्या शेतात थेट बोर्डो पेस्ट याची निर्मिती करत शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट याचे महत्व व त्याचे उपयोग पटवून दिले व ते कसे वापरावे ते सांगण्यात आले यामध्ये प्रामुख्याने चुना, मोरचूद आणि पाण्याच्या १०० ,१०० ग्राम,१लिटर योग्य प्रमाणातील मिश्रणाला (मलम) असे म्हणतात. याचा उपयोग यामुळे फळझाड हे रोगमुक्त राहते जसे की खोड किडीपासून संरक्षण मिळते व खोडापासून होणारे रोगांपासून फळझाडाला संरक्षण मिळतेबोर्डौ पेस्ट हे शेतीत वापरले जाणारे एक अतिशय प्रभावी बुरशीनाशक (Fungicide) आहे.
कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी सप्ताहामध्ये कृषीदुतानी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना शेती बद्दल नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व आधुनिक शेतीचे मार्गदर्शन अशा पद्धतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालय मुल येथील कृषीदूत विद्यार्थी, ग्रामीण कृषी कार्यानुभव(RAWE) यांनी विशेष परिश्रम घेतले व यशस्वीरित्या हा कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी सप्ताह पार पाडण्यात आला.
हा कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी सप्ताह हा उपक्रम खरोखरच यशस्वी व प्रेरणादायी ठरला असून कृषी बद्दल सकारात्मक बदल घडवेल असे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे विचार व मते आहेत.




