Wednesday, April 22, 2026
Homeकिसान शास्त्रज्ञ मंच बैठकमूल येथील कृषि महाविद्यालय तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एक्केचाळीसावी बैठक संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालय तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एक्केचाळीसावी बैठक संपन्न

मुल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

           कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एक्केचाळीसवी बैठक दिनांक २१ एप्रिल, २०२६ बुधवार रोजी मूल तालुक्यातील मोरवाही येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी मोरवाही येथील शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने खरीप पिकांसाठी पूर्वनियोजन व व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना खरीप पिकांचे वेळेवर व योग्य नियोजन करून शेतीसाठी आवश्यक पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार जमिनीची पूर्वतयारी, बियाण्यांची बिजप्रक्रीया व आवश्यक कृषि निविष्टांची तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबधित विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. तसेच महाविद्यालयात विक्रीस उपलब्ध असलेले गांडूळखत व गांडूळखत अर्कपाणी यांचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
प्रा.डॉ. रमाकांत गजभिये, उद्यानविद्या, यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच फणस, शेवगा व सीताफळ यांसारख्या बहुपयोगी फळ झाडांची लागवड करावी, या झाडांपासून दीर्घकाळ नियमित उत्पन्न मिळू शकते. फणसाच्या फळांना तसेच शेवगाच्या शेंगा, पाने व बियांना बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त आर्थिक स्त्रोत निर्माण होऊन इतर खर्च भागवण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे अतिशय कमी खर्चात व व्यवस्थापनात सुद्धा या फळ झाडांची लागवड केली जाऊ शकते. याबद्दल मार्गदर्शन केले.

       डॉ. विशाखा डोंगरे, मृदविज्ञान विषयतज्ञ यांनी माती परीक्षण व खतांचा योग्य प्रमाणात वापर याविषयी माहिती दिली तसेच मातीपारीक्षणामुळे सध्यास्थितीत जमिनीत असलेल्या अन्द्रव्याची उपलब्धता समजते व त्यानुसार रासायनिक व सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये जमिनीला नांगरणी केल्यास जमिनीचा वरचा थर भूसभूसित होऊन पाऊसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत खोलवर झिरपण्यास मदत होते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. डॉ. गीतांशु डिंकवार, वनस्पतीरोगशास्त्र विषयतज्ञ यांनी ३% मिठाच्या द्रावणाची व ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करावी त्यासोबत धानावर येणाऱ्या रोग व किडीचे व्यवस्थापन कसे करावे यावर चर्चा केली. कृषिविद्या विषयतज्ञ श्री. देवानंद कुसुंबे यांनी बोरू लागवड तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अमरदीप डेरे, कृषिअभियांत्रिकी विषयतज्ञ यांनी शेतीमधील यंत्र पद्धती व महत्व याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास एकुण २६ शेतकरी व ६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन डॉ. गीतांशु डिंकवार यांनी मानले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!