Thursday, August 20, 2026
Homeजागतिक महिला दिवसनवभारत विद्यालय मुल ,येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नवभारत विद्यालय मुल ,येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

image_pdfimage_print

मूल  ( मेहुल मनियार )

मूल येथील नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व एम. सी. व्ही. सी. विभाग मूल येथे 8 मार्च ला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.      मुख्याध्यापक तथा प्राचार्य छत्रपती बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उप निरीक्षक सौ वर्षां नैताम, सौ .रजनी झाडे , शाळेच्या पर्यवेक्षिका सौ भांडारकर , जेष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, प्रा. काटकर , प्रा. धोटे ,प्रा. उगेमुगे , प्रा.कार तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या विद्यार्थिनी कु. सानिया पाल ,दीक्षा बनकर, वल्लरी पाल, अदिती उपरीकर,परी कोंतमवार,सिद्धी घुमलवार यांनी जागतिक महिला दिनावर भाषणे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका कु. माधुरी तलांडे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक सौ वर्षा नैताम, पोलिस उपनिरीक्षक यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आणि महिलांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बारसागडे  यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला दिन म्हणजे फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर स्त्रीच्या संघर्षाची आठवण ठेवून, तिच्या हक्कांची व समानतेची जाणीव करून देणारा दिवस आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक निलेश माथनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनिल चौधरी यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!