Friday, August 21, 2026
Homeकृषि सप्ताहकृषी महाविद्यालय, मुलचा : उपक्रम. कृषी सप्ताहाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय, मुलचा : उपक्रम. कृषी सप्ताहाचे आयोजन

image_pdfimage_print

मुल (प्रा. चंद्रकांत मनियार )

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) या कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे मौजे कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली येथे कृषी महाविद्यालय, मुल येथील कृषी दुतान मार्फत १ जुलै रोजी कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे मा. कुलगुरू डॉ.शरदराव गडाख यांच्या सूचनेनुसार कृषि सप्ताह साजरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने कृषि महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा. कनेरी, ता. जि. गडचिरोली येथे कृषि सप्ताहाच्या निमित्ताने कृषीदूतांनमार्फत शेतकऱ्यांना शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीबद्दल विविध कल्याणकारी योजना, शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, फळ बागलागवड, शेतीपूरक व्यवसाय, पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन, अशा अनेक विषयांवरती प्रत्येकी सातही दिवशी कृषि दुतान मार्फत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील बांधावर भेटी देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करून विषायाणुरूप योग्य ती चर्चा व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

१ जुलै

कृषी दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात कनेरी गावातील ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आला व या कार्यक्रमांमध्ये कृषी महाविद्यालय मुल, कृषी संशोधन केंद्र सोनापूर, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली येथील उद्यानविद्या विभागाचे कृषी तज्ज्ञ डॉ. सूचित लाकडे होते, तर उद्घाटक म्हणून कणेरीचे सरपंच श्री. तुषार मडावी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी व कृषी विस्तारशाखा विषय तज्ञ डॉ. आशिष लाडे, व कृषी अभियांत्रिकी विषय तज्ञ डॉ. अमरदीप डेरे, तसेच कृषी महाविद्यालय सोनापूर येथील उद्यानविद्या विभाग विषयतज्ञ प्रणाली भैसारे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रशेखर जक्कनवार, श्री. नेताजी लोंडे, श्री. शामजी कोलते, श्री. प्रभाकर लाकडे, पोलीस पाटील श्री. गणेशजी मडावी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कनेरी येथील मुख्याध्यापक श्री. युवराज मांडले उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीदूत विद्यार्थी अथर्व डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गुरुदेव आसोले यांनी मानले.

२ जुलै –

मशागतीसाठी वापरण्यात येणारी कृषी अवजारे (Engineering Tools of Preparatory Tillage Operation)
जमिनीची मशागत करण्यासाठी विविध कृषी अवजारांचा वापर केला जातो.
मुख्य अवजारे:
नांगर (Plough), कुळव (Harrow),रोटाव्हेटर (Rotavator) कल्टिव्हेटर (Cultivator), पाटा (Leveler)
उद्दिष्ट:
जमीन भुसभुशीत करणे, तणांचे नियंत्रण करणे, पेरणीसाठी योग्य बीजपलंग तयार करणे.

३ जुलै –

भात पिकासाठी रोपवाटिकेचा बीजपलंग तयार करणे (Preparation of Seed Bed Nursery for Rice Crop)
सुपीक व पाण्याची सोय असलेली जमीन निवडावी. जमीन नांगरून भुसभुशीत करावी.
शेणखत व आवश्यक रासायनिक खते मिसळावीत. 1–1.5 मीटर रुंदीचे व आवश्यक लांबीचे वाफे तयार करावेत.
प्रक्रिया केलेले बियाणे समान अंतराने पेरावे.
हलके पाणी द्यावे व आवश्यकतेनुसार तण व कीड नियंत्रण करावे.

 

४ जुलै

फळझाड लागवडीकरिता खड्डा खान्नने आणि माती भरणे या विषयाचे प्रात्यक्षिक. (Digging and pit filling).फळझाड लागवडीसाठी प्रथमतहा खड्डा व्यवस्थित चौरस आकारात १×१×१ M मि खानने व त्यानंतर सेंद्रिय खते (शेणखत, गांडूळ खत)तसेच बुरशीनाशकाचा वापर करत त्यामध्ये वाळलेला पालापाचोळा व काळी माती टाकून खड्डा भरून घ्यावा व फळझाड व्यवस्थित मधोमध काठीचा आधार देऊन लावण्यात यावे.

५ जुलै

दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक (Demonstration of Dashparni Ark)
दशपर्णी अर्क हा दहा प्रकारच्या वनस्पतींच्या पानांपासून तयार होणारा सेंद्रिय कीटकनाशक आहे.
साहित्य:
कडुनिंब, करंज, रुई, सीताफळ, पपई, धोतरा इत्यादींची पाने. गोमूत्र, शेण व पाणी.
उपयोग:
रसशोषक व पाने खाणाऱ्या किडींचे नियंत्रण.पर्यावरणपूरक व कमी खर्चिक उपाय.

६ जुलै

बोर्डो पेस्ट निर्मिती व प्रत्यक्ष उपयोग (Bordeaux paste preparation and its uses)

कृषी दुतांनी शेतकऱ्यांच्या शेतात थेट बोर्डो पेस्ट याची निर्मिती करत शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट याचे महत्व व त्याचे उपयोग पटवून दिले व ते कसे वापरावे ते सांगण्यात आले यामध्ये प्रामुख्याने चुना, मोरचूद आणि पाण्याच्या १०० ,१०० ग्राम, १ लिटर योग्य प्रमाणातील मिश्रणाला (मलम) असे म्हणतात. याचा उपयोग यामुळे फळझाड हे रोगमुक्त राहते जसे की खोड किडीपासून संरक्षण मिळते व खोडापासून होणारे रोगांपासून फळझाडाला संरक्षण मिळतेबोर्डो पेस्ट हे शेतीत वापरले जाणारे एक अतिशय प्रभावी बुरशीनाशक (Fungicide) आहे.

कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी सप्ताहामध्ये कृषीदुतानी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना शेती बद्दल नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व आधुनिक शेतीचे मार्गदर्शन अशा पद्धतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालय मुल येथील कृषीदूत विद्यार्थी, ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) यांनी विशेष परिश्रम घेतले व यशस्वीरित्या हा कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी सप्ताह पार पाडण्यात आला.

हा कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी सप्ताह हा उपक्रम खरोखरच यशस्वी व प्रेरणादायी ठरला असून कृषी बद्दल सकारात्मक बदल घडवेल असे शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे विचार व मते आहेत.

७ जुलै -उपयुक्त व अपायकारक कीटक (Beneficial and Harmful Insects)
उपयुक्त कीटक:
मधमाशी – परागीभवनासाठी,  रेशीम किडा – रेशीम उत्पादनासाठी,  लेडीबर्ड बीटल – मावा किडीचे नियंत्रण,
ट्रायकोग्रामा – जैविक कीड नियंत्रणासाठी, अपायकारक कीटक: मावा (Aphid), खोडकिडा (Stem Borer)
फळ पोखरणारी अळी (Fruit Borer), पांढरी माशी (Whitefly)
महत्त्व:
उपयुक्त कीटकांचे संवर्धन करावे.
अपायकारक किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीने नियंत्रण करावे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!