Wednesday, October 21, 2026
Homeपि. एच.डी.कर्मवीर महाविद्यालयातील प्रा. प्रविण उपरे यांना आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालयातील प्रा. प्रविण उपरे यांना आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान

image_pdfimage_print

मूल  ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे कार्यरत राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रविण अजाबराव उपरे यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. प्रवीण उपरे यांनी “चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आमदारांचा विधानसभेच्या कामकाजातील सहभाग : एक चिकित्सक अभ्यास (कालावधी २००४ ते २०१९)” या विषयावर संशोधन पूर्ण केले. हे संशोधन त्यांनी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. उपरे यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या संशोधनामुळे विधानसभेतील आमदारांच्या कामकाजाचा सखोल अभ्यास पुढे येण्यास मदत होणार आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या यशाबद्दल प्रा. डॉ. प्रविण उपरे यांनी आपल्या आई-वडील,अर्धांगिनी,मार्गदर्शक,सहकारी मित्र, विद्यार्थी तसेच गुरुजनांचे मनःपूर्वक आभार मानून हे यश त्यांनाच समर्पित केले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!