Friday, June 5, 2026
Homeनेहरू जयंतीमूल येथील नवभारत विद्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील नवभारत विद्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात संपन्न

मूल ( मेहुल मनियार )

 नवभारत विद्यालय मुल मध्ये 14 नोव्हेंबर ला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली `बालक दिन` म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर होत्या.प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी , विजय मेश्राम तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला.त्यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते,बालके त्यांना “चाचा नेहरू” म्हणून संबोधित ,त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात `बालकदिन` म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  गुरुदास चौधरी यांनी केले.  पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या निमित्याने आंब्याचे रोप दिले. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे संचालन निलेश माथनकर यांनी तर  आभार प्रदर्शन सुनिल चौधरी यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक विकास मोडक, प्रतिमा उमक,राजू बोढे , चैतन्य पुप्पलवार, भारत सलाम, पुनमचंद वाळके दिपा गोंगल, माधुरी तलांडे, ताराचंद निमसरकार,उदयचंद चौधरी आदी शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!