Friday, June 5, 2026
Homeमृदा परीक्षणमूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी मृदा परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन.

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी मृदा परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन.

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत (RAWE) मृदा नमुना संकलन प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे बेलघाटा येथे आयोजन केले होते.  शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच संतुलित खत व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रोत्साहनाने या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. एस. आर. मुन्नरवार, डॉ. ए. जे. इंगोले, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश नवघरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.
हा उपक्रम राबविण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या  कृषी कन्या कु. श्रिया बोधे, कु. गनिका बुधे, कु. स्नेहल भोयर, कु. समृद्धी दडगेलवार यांनी बेलघाटा येथील शेतकऱ्यांच्या शेतांमधून मृदा नमुने संकलित केले आणि मातीचे नमुने योग्य पद्धतीने कसे घ्यावेत, मृदा परीक्षणासाठी नमुने कसे तयार करावेत आणि मृदा आरोग्य पत्रिकेचा उपयोग कसा करावा याबाबत चे मार्गदर्शन केले.


यावेळी शेतकऱ्यांना जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब तसेच इतर आवश्यक घटकांची माहिती मृदा परीक्षणाद्वारे मिळू शकते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मृदा परीक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम शाश्वत शेती व मृदा आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!