Sunday, June 21, 2026
Homeचारा प्रक्रियालोणवाही येथे चारा प्रक्रिया (Fodder Treatment) विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

लोणवाही येथे चारा प्रक्रिया (Fodder Treatment) विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

मूल (प्रा. चंद्रकांत मनियार )

 कृषी महाविद्यालय, मूलच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत कृषी कन्यांद्वारे  सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही येथे चारा प्रक्रिया (Fodder Treatment) व पशुखाद्य व्यवस्थापन या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्याच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणे तसेच पशुधनाचे पोषण, आरोग्य आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास प्रोत्साहन देणे हा होता.

हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभारी डॉ. देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे तसेच पशुसंवर्धन विषयतज्ज्ञ डॉ. मुन्नरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

 

        या कार्यक्रमात (RAWE )विद्यार्थीनी  कु.करुणा साहू,  कु. महारुख शेख,  कु.मोहिनी तिखट,  कु.पल्लवी उरकुडे आणि कु.श्रद्धा वालोदे यांनी शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे महत्त्व, युरिया प्रक्रिया केलेला कडबा, सायलेज निर्मिती तसेच संतुलित पशुखाद्य व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. उपलब्ध कोरड्या चाऱ्याची गुणवत्ता वाढवून त्याची पचनक्षमता व पोषणमूल्य कसे सुधारता येते याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

चारा प्रक्रियेमुळे जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ, खाद्य खर्चात बचत, चाऱ्याचा अपव्यय कमी होणे आणि पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत किंवा चारा टंचाईच्या काळात चारा प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांना सायलेज व युरिया प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करून उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला.

कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चारा प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते तसेच पशुधनाचे आरोग्य व उत्पादनक्षमता सुधारते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शाश्वत पशुपालन आणि कृषी विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!