Friday, August 21, 2026
HomeUncategorizedमुल येथील आनंदराव शेंडे यांचा अमृत महोत्सव नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील आनंदराव शेंडे यांचा अमृत महोत्सव नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       वयाचे 75 वर्ष पूर्ण होऊन मुल येथील आनंदराव शेंडे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा त्यांच्या कुटुंबीयांनी नागपूरच्या जवाहर  विद्यार्थीगृहात मोठ्या आनंदात साजरा केला. पावसाचे दिवस असूनसुद्धा सारेच आप्त आणि त्याच्या सहचर्यात आलेले बालपण, उमेदीचा काळ व आत्ताच्या सुखविलासातील काळातील मित्रपरिवार… अशा सर्वांनी हजेरी लावली. वेगवेगळ्या कार्यातून आपल्या जीवनाचा प्रवास करताना आनंदराव यांना शेती व्यवसायात अधिक आवड असल्याबाबत याप्रसंगी बोलून दाखविले.

 

        मुली, मुलगा, सुना, नातवंड आणि नातेवाईकांनी ओवाळणी करुन व प्रसंगी समयोचित केलेल्या नृत्याविष्कारातून आनंदच्या कर्तृत्वाचे उभे केलेले प्रसंग बघून डोळे कृतकृत्य होत होते. विशेष म्हणजे त्याच्याविषयी बोलतांना निवडक मंडळीच्या भाषणातून त्याचा आजवरचा जीवनपट सहज समोर आला. त्यातून तो आजही अजातशत्रू कां आहे,हे ही कळून आले. वहिनीसाहेब सौ. कल्पनाताई, सुन सौ. मनिषा, मुली सौ. मंजुषा आणि श्वेता,मुलगा शिरीष, जावईद्वय श्री. नितीन आणि कपेश तसेच नातवंड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट आवर्जून नमूद करावेसे वाटतात.

७५ वर्षांचा हा अमृतमहोत्सवी टप्पा गाठणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आयुष्यभराच्या अनुभवातून, कष्टातून, प्रामाणिकपणातून आणि संस्कारातून अनेकांना प्रेरणा देणारे हे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध आहे.
७५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे सुख-दुःख, यश-अपयश आणि अनेक आठवणींचा खजिना आहे. या पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, शांततामय आणि समाधानाचे जावो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आनंदराव यांना उपस्थित मंडळींनी दिल्या. या प्रसंगी कुटुंबीयातील सर्व सदस्य आणि मित्र परिवार यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!