मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी व आठवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या हिंदी , इंग्रजी व मराठी माध्यमातील शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवभारत हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय,मूल येथे आयोजित करण्यात आले आहे.
- या शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी केंद्र संचालिका आम्रपाली बागेसर, केंद्र प्रमुख पेंदोर , प्राचार्य बारसागडे, प्रा.महेश पानसे ,पत्रकार दुर्योधन धोंगडे व तज्ञ मार्गदर्शक किशोर नरड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सदर शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक परीक्षा पद्धती, नविन अभ्यासक्रम माहिती, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्वरूप, वेळेचे , वेळेचे नियोजन व अभ्यास तंत्र या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनि सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




