Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025निष्ठा, कार्यशैली आणि जनाधारामुळे राहुल प्रेमलवार भाजपासाठी हक्काचे दावेदार
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

निष्ठा, कार्यशैली आणि जनाधारामुळे राहुल प्रेमलवार भाजपासाठी हक्काचे दावेदार

image_pdfimage_print

मूल

भाजपाचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते राहुल प्रेमलवार यांनी प्रभाग क्रमांक १० मधून नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारीची मागणी केली आहे. प्रेमलवार हे भारतीय जनता पक्षाच्या शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले असून, संघटनात त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे.

सन २०१६ मध्ये त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना ३०५ मते मिळाली होती. त्या वेळेपासूनच त्यांनी सातत्याने पक्षनिष्ठेने कार्य करत, स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार निर्माण केला आहे.

बांधकाम व्यवसायिक असलेले राहुल प्रेमलवार हे सक्षम कार्यशैली, स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. प्रभाग क्रमांक १० मध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय असून, स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक पातळीवर त्यांचे नाव भाजपाकडून संभाव्य उमेदवार म्हणून जोरात चर्चेत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!