Saturday, August 22, 2026
Homeपशु लसीकरणग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे पशुलसीकरण शिबिर उत्साहात संपन्न...... कृषी...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे पशुलसीकरण शिबिर उत्साहात संपन्न…… कृषी महाविद्यालय मुलच्या कृषीदूतांकडून पशु लसीकरणाचे यशस्वी आयोजन

image_pdfimage_print

निरोगी पशुधनासाठी कृषीदूतांची पुढाकाराने लसीकरण मोहीम

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, मुल येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील मौजे इंदाळा, येथे दिनांक २८ जुलै २०२६ रोजी कृषी महाविद्यालय, मुल च्या कृषीदूतांच्या माध्यमातून जनावरांच्या आरोग्य संरक्षणासाठी पशुलसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिरासाठी कनेरी, पारडी व इंदाळा या तिन्ही गावांतील कृषीदूत एकत्र येऊन इंदाळा येथे जनावरांची लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना, पारडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर खोब्रागडे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

कृषीदूतांनी शेतकऱ्यांना पशुलसीकरणाचे विविध फायदे समजावून सांगितले. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, रोगमुक्तता, आजार नियंत्रण, सुदृढ आरोग्य, दूध उत्पादनात वाढ, आजार व रोगप्रतिकारक क्षमता वाढणे, तसेच जीवघेण्या आजारांपासून संरक्षण मिळणे यांचा समावेश होता. लाळ्या-खुरकूत (FMD), फऱ्या (Black Quarter), लंपी, घटसर्प, घाणसर्प व रेबीज यांसारख्या संसर्गजन्य रोगांपासून लसीकरणामुळे संरक्षण मिळते. लाळ-खुरकूतमध्ये तोंडात व खुरांमध्ये फोड येणे, लाळ गळणे व चालताना लंगडणे, बुळकांडी रोगात शरीराचे तापमान १०४° ते १०७° फॅरेनहाईटपर्यंत वाढणे, तोंडातून लाळ व डोळ्यांतून स्राव येणे, स्तनदाह (Mastitis) मध्ये कासेला सूज येणे, दूध कमी होणे व दुधाचा रंग बदलणे, तर पायकूज (Foot Rot) मध्ये खुर सडणे व पू होणे अशी लक्षणे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोठा कायम स्वच्छ व कोरडा ठेवणे, पशुवैद्यांच्या सल्ल्याने वेळेवर लसीकरण करणे आणि दूषित अन्न व पाणी जनावरांना न देणे, या बाबींवर विशेष भर देण्यात आला.

लसीकरणामुळे जनावरांचा मृत्यूदर कमी होतो, दूध व मांस उत्पादनात वाढ होते, औषधोपचाराचा खर्च वाचतो आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. तसेच जनावरांपासून माणसांमध्ये पसरणारे झूनोटिक आजार रोखण्यास मदत होते आणि सुरक्षित दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होतात, अशी माहिती कृषीदूतांनी दिली. कृषीदूतांनी पशुवैद्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जनावरांच्या लसीकरणात मदत केली. शेतकऱ्यांना विविध रोग व उपलब्ध लसींबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये फऱ्या (Black Quarter), तोंडखुरी व पायखुरी (FMD), घटसर्प, धनुर्वात (Tetanus), स्तनदाह (Mastitis) व लंपी या रोगांसाठी आवश्यक लसी देण्यात आल्या. इंटेरोटॉक्सिनिया व्हॅक्सिन, गोटपॉक्स व्हॅक्सिन, लंपी व्हॅक्सिन, मास्टायटीस व्हॅक्सिन, ब्लॅक क्वार्टर व्हॅक्सिन तसेच इतर रोगप्रतिबंधक लसी जनावरांच्या वर्गवारीनुसार व गरजेनुसार देण्यात आल्या. सदर शिबिराला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने जनावरांचे लसीकरण करून लाभ घेतला.

कृषी महाविद्यालय, मुल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे, कृषी संशोधन केंद्र, सोनापूर (गडचिरोली) येथील प्रभारी डॉ. गणवीर, डॉ. सतीश मुन्नरवार व डॉ. प्रवीण घुबेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग व शेतकरी यांनी उपस्थित राहून मोलाचा सहभाग नोंदविला. हा उपक्रम समाधानकारक व प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले. “लसीकरण ही केवळ गरज नसून भविष्यातील संजीवनी आहे. निरोगी पशुधन, समृद्ध गोठा आणि पशुधनाच्या रक्षणासाठी लसीकरण क्रांतीचे हे पर्वच म्हणावे लागेल,” असा आशावादी संदेश या शिबिरातून देण्यात आला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!