Friday, June 5, 2026
Homeमृदा परीक्षणमूल येथील कृषी दुतांनी कनेरी गावातील शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाबाबत मार्गदर्शन केले

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषी दुतांनी कनेरी गावातील शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाबाबत मार्गदर्शन केले

    मृदा परीक्षणामुळे उत्पादनवाढ शक्य; कृषी दूतांनी कनेरीत दिले मार्गदर्शन  

 मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

         डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, मूल (मारोडा) येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषि दूतांनी गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी गावात शेतकरी बांधवांसाठी मृदा नमुना संकलन व मृदा परीक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम ३ जून २०२७ रोजी आयोजित केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये मृदा परीक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देऊन पीक उत्पादनात वाढ घडवून आणणे हा होता. या कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वैज्ञानिक शेतीविषयक माहिती जाणून घेण्यास विशेष उत्सुकता दर्शविली.
या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाविषयी माहिती देत असताना कृषि दूतांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मृदा नमुना संकलनाची शास्त्रोक्त पद्धत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. त्यामध्ये शेतातील विविध ठिकाणांहून योग्य खोलीपर्यंत माती गोळा करणे, दगड व काडीकचरा यांसारख्या अशुद्ध घटकांचे विलगीकरण करणे, नमुना व्यवस्थित मिसळून प्रतिनिधिक नमुना तयार करणे तसेच प्रयोगशाळेकडे पाठविताना घ्यावयाची आवश्यक काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जसे की, नमुना सावलीत वाळवून स्वच्छ पिशवीत भरावा आणि त्यावर शेतकऱ्याचे नाव, गाव, शेती गट क्रमांक व सर्वे क्रमांक नमूद करावा. यामुळे मातीचे अचूक विश्लेषण होण्यास मदत होते, असे कृषि दूतांनी स्पष्ट केले.
या मृदा परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची स्थिती समजते आणि पिकांच्या गरजेनुसार खतांचा संतुलित वापर करता येतो. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत मिळते, अशी महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. कृषि महाविद्यालय, मूल (मारोडा) येथील मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, मूल रोड, गडचिरोली येथे उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात कृषि दूत .म्हणून..अमित हमंद, ऋषिकेश जाधव, आणि विशाल जाधव सहभागी झाले होते.

        या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषि संशोधन केंद्र प्रभारी डॉ. गणवीर, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे आणि मृदा शास्त्रज्ञ डॉ. विशाखा डोंगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शाश्वत व वैज्ञानिक शेतीच्या प्रसारासाठी प्रभावी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!