Saturday, August 22, 2026
Homeनेत्रदान जागरूकताइंदाळा येथे नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न 
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

इंदाळा येथे नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न 

image_pdfimage_print

मूल ( प्रा.चंद्रकांत मनियार )

स्व. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ( RAWE ) गडचिरोली जिल्ह्यातील इंडाला येथे नेत्रदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
गडचिरोली जिल्हा महसूल मंडल अधिकारी प्रशांत धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात इंडाळा गावचे सरपंच मारोती जेंगठे, तलाठी अश्विन तलांग, मुरलीधर इचकापे आदी मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी नेत्रदानाचे महत्त्व सांगण्यात आले . डोळे हे मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील अवयव असल्याचे सांगून नेत्रदाना साठी कुठल्याही वयाचे किंवा व्यक्तीचे बंधन नाही याबाबत विद्यार्थ्यांकडून  माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी चेतन कापगते यांनी केले.
कृषी महाविद्यालयाच्या स्वयंम जथाडे, रोहित राऊत आणि चेतन कापगते या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.   

         कृषी महाविद्यालय मुल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या प्रेरणेतून आणि समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

नेत्रदानाचे महत्त्व या बद्दल माहिती मिळाल्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!