Sunday, June 21, 2026
Homeपाणी समस्यामूल मध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित राहणार नाही

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल मध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित राहणार नाही

मूल ( मेहुल मनियार )

      मागील काही दिवसापासुन मुल शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक 17.06.2026 रोजी घागर मोर्चा काढुन नगर परिषदेला निवेदन दिले.

       मोर्चाचे अनुषंगांने मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी प्रेस नोट काढून सांगितले की, दिनांक 11.6.2026 ते 15.6. 2026 या कालावधीत वादळ वारा व पावसामुळे बेंबाळ ते हरणघाट पंप हाउस पर्यंत येणारा विद्युत पुरवठा होणारे विद्युत खांब पडुन तारा तुटल्या असल्याने हरणघाट पंपहाऊसपर्यंत येणारा विज पुरवठा खंडीत झाला होता आणि दिनांक 15.6.2026 रोजी सायंकाळी 7.00 वा. विज पुरवठा सुरळीत झाला असता. पंपहाऊसवरील मोटारपंप सुरू करून टाक्या भरण्याचे काम सुरळीतपणे सुरू होते,

परंतु दि. 16.6.2026 चे रात्री दिड वाजता अचानक विद्युत भार अस्थिर झाल्याने पंपहाऊस वरीत पॅनेल मध्ये तांत्रीक बिघाड आल्यामुळे पंप बंद ठेवावे लागले, तरी पण दिनांक 16.6.2026 रोजी ज्या टाक्या भरल्या होत्या व टाक्यांचे सकाळी नियमीतपणे पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीमुळे सायंकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

पालीका प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून दि.16.6.2026 रोजी रात्री पंपहाऊस वरील तांत्रीक दुरूस्ती करून दिनांक 17.6.2026 रोजी सकाळी व सायंकाळी मुल शहरात मुबलक पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच पंपहाऊस वरील 90 व 75 एच.पी. चे मोटरपंप दुरूस्त करण्यात आले असुन येत्या दोन दिवसात फिटींग करून अडचणीचे वेळी त्याचा वापर करण्यात येईल अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे. मागील पाच दिवस जो पाणी पुरवठा बंद होता याची नगर परिषदेला जाणीव असुन असे यापुढे अनपेक्षितपणे पाणी

पुरवठा खंडीत राहणार नाही यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. तरी संपुर्ण शहरात मुबलक पाणी पुरवठा होईल असे न.प. प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!