Saturday, June 13, 2026
Homeमृदा परीक्षणमूल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी किन्ही गावात दिले माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन, शेतकरी...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी किन्ही गावात दिले माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन, शेतकरी झाले लाभान्वित

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

      पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील  कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गावात येऊन शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या मार्गदर्शन शिबिरात मातीची सुपीकता कशी तपासावी, कोणत्या पिकासाठी कोणते खत वापरावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

         या उपक्रमात मार्गदर्शक म्हणून कु.भाग्यश्री घागी, कु.हिरल गोंगले, कु. प्रणाली गुरनुले, कु. मोनाली हतीमारे व कु.आचल कडसकर या विद्यार्थिनी उपस्थित राहून. त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मातीचा नमुना घेणे, मातीतील घटक समजून घेणे आणि योग्य खत व्यवस्थापन यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

         कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या प्रेरणेतून व समन्वयक डॉ. आर. पी.गजभिये यांच्या मार्गदर्शनातून  घेतलेल्या या कार्यक्रमास गावातील शेतकरी वामन भेंडाळे, गिरीश वसाके, लोमेश गुरनुले, जनार्धन गावडे व कारूजी गावडे मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या शंका विचारून मार्गदर्शन घेतले.

          माती परीक्षण केल्यामुळे खर्चात बचत होते आणि उत्पादनही वाढते, हे आज समजले” असे मत शेतकरी वामन भांडले यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!