Friday, June 5, 2026
Homeपर्यावरण दिवसमूल येथील कृषि महाविद्यालय येथे “जागतिक पर्यावरण दिन” उत्साहात साजरा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालय येथे “जागतिक पर्यावरण दिन” उत्साहात साजरा

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

           पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने १९७२ पासून सुरू केलेल्या या जागतिक उपक्रमाच्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, मूल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना “Inspired by Nature. For Climate. For Our Future.” अशी होती.

      कृषी महाविद्यालयाचे  सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात  प्रमुख अतिथी म्हणून मुल येथील मंडल कृषी अधिकारी  शुभम किरमिरवार, उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. आतापर्यंत कृषि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व तसेच वस्तीगृह परिसरामध्ये सुमारे 1000 च्या वर वृक्षांची लागवड केली हे त्यांनी आवर्जून सांगितले व पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे, वाढत्या प्रदूषणावर आळा घालणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाद्वारे नैसर्गिक संसाधनांचे जतन करून भावी पिढ्यांसाठी निरोगी, स्वच्छ व शाश्वत पर्यावरण निर्माण करता येईल, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी डॉ. व्ही. जी. अतकरे तसेच प्रमुख अतिथी श्री. शुभम किरमिरवार(मंगळ कृषी अधिकारी मूल) .यांच्या हस्ते आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दोन वृक्षांची प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालय परिसरामध्ये लागवड करण्यात आली.. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे व आभार प्रदर्शन मृद विज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नागेश नवघरे सहाय्यक प्राध्यापक यांनी केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!