Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025प्रभाग २ मध्ये भाजपचा प्रचार जोरात, विरोधकांचे मनोबल खच्ची
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रभाग २ मध्ये भाजपचा प्रचार जोरात, विरोधकांचे मनोबल खच्ची

image_pdfimage_print

मूल

आगामी मूल नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग २ मध्ये भाजपचे उमेदवार सूरज मांदाडे आणि अश्विनी निकोडे यांचा प्रचार चांगलाच वेग घेत आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. किरण कापगते यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील प्रचारमोहीम अधिक जोमात सुरू असून, या प्रचारामुळे विरोधकांचे मनोबल स्पष्टपणे खच्ची होताना दिसत आहे.

प्रभागातील मुख्य सामाजिक घटकांसह सर्वच मतदारांमध्ये भाजप उमेदवारांविषयी मोठा उत्साह दिसून येत आहे. सूरज मांदाडे आणि अश्विनी निकोडे यांना प्रभागवासीयांनी आधीच आपला नगरसेवक मानल्याची भावना व्यक्त होत असून, दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. किरण कापगते यांना देखील प्रभाग २ मधून रेकॉर्ड मतांनी आघाडी मिळेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभागातील वातावरण पूर्णतः भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!