Thursday, August 20, 2026
Homeवृक्षारोपण कार्यक्रममुल येथील कर्मवीर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पेड माँ के नाम’ तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात पिंपळ, सीताफळ, जांभूळ, करंज, शिवण, वड आदी विविध प्रजातींच्या २० रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, १ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत एकूण ५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NCC अधिकारी डॉ. उज्वला कापगते, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण उपरे, प्रा. राहुल बोधे, प्रा. अनिल शेलेकर, प्रा. सिकंदर लेनगुरे यांच्यासह प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, NSS स्वयंसेवक व NCC कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!