Friday, August 21, 2026
Homeनशामुक्त अभियानमूल येथील नवभारत विद्यालय, येथे 'दहा कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांना...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील नवभारत विद्यालय, येथे ‘दहा कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ

image_pdfimage_print

मूल  ( प्रा. चंद्रकांत मनियार )

   मूल येथील नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल येथे 7 ऑगस्ट 2026 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने भारत सरकारच्या अनुमतीने राबविण्यात येणाऱ्या ‘दहा कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांना नशामुक्ती बद्दल मार्गदर्शन आणि शपथ देण्यात आली. हे अभियान दिनांक 6 ते 20 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य  सी. जी. बारसागडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पर्यवेक्षिका सौ. वर्षा भांडारकर व ज्येष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक दीपा दीदी व सुरेश रायकंटीवार यांनी विद्यार्थ्यांना नशेचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि निरोगी समाजनिर्मितीसाठी युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत घडविण्याची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष गुलानी व इंदुताई पुप्पलवार यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी स्वतः नशेपासून दूर राहण्याबरोबरच इतरांनाही जागृत करण्याचा संकल्प केला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!