Friday, August 21, 2026
Homeस्वच्छता अभियानपरिसर स्वच्छतेची तळमळ जोपासणारे डॉ. वि. जी. अतकरे
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

परिसर स्वच्छतेची तळमळ जोपासणारे डॉ. वि. जी. अतकरे

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

स्वच्छता ही निरोगी आणि सुखी जीवनाचा पाया आहे. स्वच्छतेमुळे आपले शरीर, मन आणि परिसर निरोगी राहतात. स्वच्छ वातावरणात रोगराई कमी पसरते आणि आरोग्य चांगले राहते. मानवी जीवनात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे फार महत्त्व आहे ही जाणीव मूल येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या संकल्पनेतून सतत दिसून येते. स्वच्छता हीच सेवा हे त्यांच्या जीवनातील ब्रीदवाक्य आहे.

महाविद्यालय परिसराची स्वच्छता ठेवण्याबद्दल त्यांची तळमळ इतकी महत्वाची आहे की, त्यांनी 25 जून 2026 ला स्वच्छतेचा 53 वा उपक्रम साजरा केला. 2017 पासून आता पावेतो त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी परिसर स्वच्छतेचे 509 उपक्रम पूर्ण केले आहे.  विशेष म्हणजे 23 एप्रिल 2026 ला स्वच्छता हीच सेवा उपक्रमाचा त्यांनी 500 वा टप्पा गाठून मुल येथील महाविद्यालय परिसरात आणि सोमनाथ येथील परिसरात श्री. चंद्रशेखर गलगलीकर, नागपूर यांच्या मुख्य उपस्थितीत स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या या सामाजिक कार्याला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नेहमी सहकार्य करतात. कृषी महाविद्यालयाच्या परिसराचा त्यांच्या स्वच्छतेच्या संकल्पनेतून पूर्णपणे कायापालट झाला आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ आणि फुलांच्या झाडातून चमकणारे सौंदर्य त्यांच्या कार्याची नेहमी पावती देतात. त्यांचे हे कार्य अविरत सुरू राहावे हीच शुभेच्छा दिली जाते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!