Wednesday, October 21, 2026
Homeकबड्डी प्रतियोगितामूलमध्ये कबड्डीचा थरार! युवाशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने 'महासंग्रामाचे' आयोजन; ५१ हजारांचे पहिले...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूलमध्ये कबड्डीचा थरार! युवाशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने ‘महासंग्रामाचे’ आयोजन; ५१ हजारांचे पहिले बक्षीस

image_pdfimage_print

​मूल

महाराष्ट्राची माती आणि संस्कृती जपणाऱ्या कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मूल येथील युवाशक्ती क्रीडा मंडळाने कंबर कसली आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी युवाशक्ती क्रीडा मंडळाच्या पटांगणावर १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘कबड्डी महासंग्रामाचे‘ आयोजन करण्यात आले आहे.

​या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी बक्षिसांची मोठी लूट असणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्याकडून ५१ हजार रुपये रोख आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येईल. द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपये व चषक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांच्याकडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये व चषक नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ आणि नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्या वतीने देण्यात येईल, तर युवाशक्ती क्रीडा मंडळाकडून चतुर्थ क्रमांकासाठी ११ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

​सांघिक यशासोबतच वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट रेडर‘ (अली अब्बास मिस्त्री), ‘सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर‘ (अरविंद करपे) आणि ‘सर्वोत्कृष्ट डिफेंडर‘ (लवनिश उधवाणी) यांच्यातर्फे प्रत्येकी ३ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

​या ग्रामीण कबड्डी महासंग्राममध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी ५०० रुपये प्रवेश शुल्क भरून आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. नाव नोंदणीसाठी तेजस महाडोळे (९९२२७३३३४५), सागर मांडवकर (८६६८९२५९०७) किंवा अविनाश चहार (७२१९७५८४९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष रूपलसिंह रावत, उपाध्यक्ष प्रविण चेपुरवार, कोषाध्यक्ष गुलाबखाॅ पठाण, सचिव चतुर मोहुर्ले, सहसचिव चंद्रकांत चटारे आणि क्रीडा प्रमुख दिपक चुगाणी यांसह मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!