Tuesday, April 21, 2026
Homeकिसान शास्त्रज्ञ मंच बैठकमूल येथील कृषि महाविद्यालय तर्फे शेतकरी शाश्त्रज्ञ् मंच ची 37 वी बैठक...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालय तर्फे शेतकरी शाश्त्रज्ञ् मंच ची 37 वी बैठक संपन्न

मुल:( प्रा. चंद्रकांत मनियार )

    मूल येथील कृषी महाविद्यालय द्वारा 37 वी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक ३० डिसेंबर, २०२५ मंगळवार रोजी मूल तालुक्यातील ग्राम चिचाळा येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, प्रगतशील शेतकरी रविंद्र गुरुनुले, एकनाथ लेनगुरे, तसेंच इतर शेतकरी बांधव सह कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “भात काढणीनंतर रब्बी हंगामात विविध पिकांची लागवड व अळिंबी उत्पादन पर्यायी उत्पनाचे एक साधन” या विषयावर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, शेतीत होणाऱ्या  खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रब्बी हंगामात जवस, मोहरी, करडई या पिकांची लागवड करताना योग्य वाणाची निवड करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतीतील शाश्वत उत्पादनासाठी माती परीक्षण करणे काळाची गरज आहे तसेच अळिंबी उत्पादन पर्यायी उत्पनाचे एक साधन आहे असे सांगितले. डॉ. एस. वाय. कडू,  सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक उन्हाळी धान ऐवजी वांगे, टमाटर, कोथिंबीर, मेथी  यासारख्या भाजीपाला पिकांची  कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याकरिता भाजीपाला पिकांची लागवड सुधारित तंत्रज्ञानाच्या वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्‍नील ठाकरे, कृषिविद्या विषयतज्ञ यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भात काढणीनंतर उपलब्ध ओलावाच्या फायदा घेत रब्बी हंगामात जवस व मोहरी या तेलबिया पिकांची पंच: सूत्री पद्धतीने लागवड व व्यवस्थापन करावे. यापासून शेतकऱ्यांच्या अधिक आर्थिक नफा मिळवता येतो सोबतच आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही पिके अतिशय महत्त्वाचे असल्याचे विषद केले.

डॉ. विशाखा डोंगरे, मृदाविज्ञान विषयतज्ञ यांनी शाश्वत शेतीसाठी  सेंद्रिय खताचा वापर रासायनिक खतांसोबत करणे, सेंद्रिय वापरामुळे जमीनीचा पोत सुधारतो व सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त असे सांगितले. रासायनिक खतांचावापर विद्यापिठाच्या शिफारसीनुसार करावा आणि नत्र पिकास विभागून वाढीच्या अवस्थेनुसार द्यावे. कमीत कमी तीन वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करावे यावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रविणा बरडे, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ यांनी अळिंबी उत्पादन पर्यायी उत्पनाचे साधन या विषयावर मार्गदर्शन केले. अळिंबी मध्ये प्रथिने, खनिजद्रव्ये व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. अळिंबीतील बी, सी, डी, सारख्या जीवनसत्व तसेच खनिजांच्या विपुलतेमुळे आरोग्यातील महत्व असल्यामुळे अळिंबी मागणी वाढत आहे असे सागितले. धानाच्या तनिसाचा वापर करून शेतकरी अळीबी उत्पादन घेऊ शकतात व आर्थिक उत्पनाचे पर्यायी साधन म्हणून अळिंबी लागवड करावी असे सांगितले.

सहाय्यक प्राध्यापक कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ अमरदीप डेरे यांनी सौर उर्जेच्या वापर करून शेताला कुपन प्रणाली तसेच वन प्राण्यापासून पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी सौर उर्जाचलित ध्वनी यंत्राच्या वापर करून वन प्राण्यापासून होणारा त्रास कमी  करता येउ शकतो, शेतकरी बांधवांनी या यंत्रांच्या वापर करावा असे सुचविले. सदर कार्यक्रमास एकुण २५ शेतकरी उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. अमरदीप डेरे कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ, यांनी केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!