मुल
प्रभाग 3 मधून काँग्रेस तर्फे उमेदवार ठरलेले नितीन गद्देवार यांनी प्रचाराला जोरदार गती दिली आहे. त्यांच्या सोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभ्या असलेल्या सौ एकता समर्थ आणि त्यांचे पती प्रशांत समर्थ यांच्या जनसमर्थनामुळे प्रचाराला विशेष कलाटणी मिळाली आहे.
प्रभागवासीयांमध्ये उत्साह दाखवायला सुरुवात झाली असून, “या वेळेत प्रभाग 3 मध्ये सर्वाधिक मतांचे यश मिळेल” असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
गद्देवार यांनी आपल्या ओळखीला “आम आदमी” चा चेहरा बनवलेला आहे.म्हणजे, धनशक्ती किंवा राजकीय पटलावरचे मोठे आवाज नसून, स्थानिक सामान्य जनतेशी जोडलेले उमेदवार.
एकता समर्थ आणि प्रशांत समर्थ यांच्या नियमित उपस्थितीने प्रचारात त्यांना स्थिर जनभार मिळविण्याची ताकद लाभली आहे.प्रचारातील सक्रियता यांनी, त्यांचा प्रसार प्रभागात वेगाने वाढला आहे.
असे संकेत मिळतात की या त्रिमूर्तीने एकत्र येऊन प्रभाग 3 मध्ये उंच मतसंख्येचा ट्रेंड तयार केला आहे
मतदारांनी आपल्या मतदानाची जबाबदारी ओळखली आहे आणि निर्वाचनाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान करण्याची भावनाही दृढ झाली आहे.
- उमेदवाराची प्रचारशक्ती आणि जनसमर्थन या दोन्हींचा संगम बघून असा अंदाज येतोय की, प्रभाग 3 मध्ये सर्वाधिक मत मिळवण्याची संधी गद्देवार-समर्थ यांच्याकडे आहे.




