Friday, August 21, 2026
Homeवृक्षारोपण कार्यक्रमसोमनाथ येथील कृषी महाविद्यालयाच्या पडीक जमिनीवर होणार वृक्षारोपण
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

सोमनाथ येथील कृषी महाविद्यालयाच्या पडीक जमिनीवर होणार वृक्षारोपण

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालय व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 500 व्या स्वच्छता- ही- सेवा अभियान अंतर्गत 23 एप्रिल 2026 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी साडेचार वाजता सोमनाथ येथे आयोजित  केलेल्या या कार्यक्रमात नागपूर चे आर्ट ऑफ लिविंग चे वरिष्ठ प्रशिक्षक व समाजसेवक मान.चंद्रशेखर गलगलीकर, नागपूरच्या समाजसेविका डॉ.जयश्री गलगलीकर, दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत, मूल येथील वरिष्ठ पत्रकार प्रा. चंद्रकांत मनियार, विनोद इंगोले, वरिष्ठ विदर्भ प्रतिनिधी ॲग्रोवन,आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याबाबत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व आयोजक डॉ. विलास अतकरे यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमाबाबत डॉक्टर अतकरे यांनी सांगितले की हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाच्या सोमनाथ येथील जागेवर संपन्न होणार आहे,या आयोजनात ७० फणसाची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.याकरिता ०.५ एकर पडीत असलेली जमीन वृक्ष लागवडीकरीता पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील वातावरण फणस लागवडीकरीता पोषक असून झाडांची उपलब्धता गडचिरोली येथील शासकीय रोपवाटिकेतून करण्यात येणार आहे रोपे आर्ट ऑफ लिव्हिग परिवार नागपूर मार्फत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!