Saturday, August 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल नगर परिषदेच्या निवडणुकी साठी 24 मतदान केंद्र राहतील
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगर परिषदेच्या निवडणुकी साठी 24 मतदान केंद्र राहतील

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार)

मुल नगरपरिषद च्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणूक संदर्भात येथील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार श्रीमती मृदुला मोरे यांनी निवडणुकीच्या संदर्भात माहिती दिली.

2 डिसेंबरला मूल नगरपरिषद च्या निवडणुकीसाठी मूल शहरात 24 मतदान केंद्र निश्चित केलेले असून या मतदान केंद्रांवर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या सोयी ठेवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत राहील. मुल नगरपरिषद क्षेत्रातील 10636 पुरुष, 11108 महिला आणि अन्य एक असे एकूण 21745 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील. मुल नगर परिषदेत 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी संदीप दोडे ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नायब तहसीलदार प्रवीण चिडे उपस्थित होते. मतमोजणी तहसील कार्यालय मुल येथे तीन डिसेंबर 2025 ला सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल असे सांगण्यात आले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!