Saturday, August 22, 2026
Homeप्रात्यक्षिक ज्ञानमूल येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाची केली व्यवस्था
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाची केली व्यवस्था

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मणियार )
मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाला अनुसरून प्रात्यक्षिक करण्याची सोय प्राप्त व्हावी,म्हणून या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व प्राध्यापक यांच्या सहकार्याने महाविद्यालय परिसरात नव्याने बांधलेल्या ग्रीन हाऊस अंतर्गत अनुभवात्मक शिक्षण मॉडेल HORT 4813 च्या सहाय्यातून भाज्या आणि फुलांची सुरक्षित लागवड कशी करावी, याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पुरविली जात आहे.

भाज्या आणि फुलांच्या लागवडीबाबत संपूर्ण ज्ञान आणि विपणन व्यवस्थेबाबत ची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने भविष्यात त्याचा लाभ त्यांना निश्चितपणे मिळू शकेल. या प्रत्यक्ष अनुभवाचा लाभ विद्यार्थी कौशल्यपूर्ण आणि मोठ्या मेहनतीतून घेत आहेत. याबाबत डॉ. अतकरे यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांना कृषी विषयाच्या पुस्तकी अध्यापना बरोबर प्रात्यक्षिकाचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे महाविद्यालयातर्फे ही सोय पुरविली जात असून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात नक्कीच फायदा मिळेल.

   या मुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे मिळत असून त्यांच्या जीवनात फायदेशीर ठरणार आहे

 

   मूल तालुक्यातील एकमेव असलेल्या शासकीय कृषि महाविद्यालयात विदर्भातील वेगवेगळ्या शहरातून आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कृषि क्षेत्राचे शिक्षण घेत आहे. डॉ. अतकरे यांच्या सतत प्रयत्नातून विद्यार्थ्यांना पुस्तकी आणि प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, या साठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, हे विशेष.

 

 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!