Saturday, August 22, 2026
Homeअवयव दानकर्मवीर महाविद्यालय, मूल येथे जागतिक युवा दिन व जागतिक अवयवदान दिन उत्साहात...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे जागतिक युवा दिन व जागतिक अवयवदान दिन उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

मूल  ( मेहुल मनियार )

      शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे 12 ऑगस्ट रोजी जागतिक युवा दिन व जागतिक अवयवदान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. कार्यक्रमासाठी डॉ. मीना नंदनवार, उपजिल्हा रुग्णालय, मूल तसेच सौ. ममता शेंडे, समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय, मूल यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.

यावेळी डॉ. मीना नंदनवार व सौ. ममता शेंडे यांनी जागतिक युवा दिन आणि जागतिक अवयवदान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. युवक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असून, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची मोठी क्षमता युवकांमध्ये आहे. युवकांनी सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जागरूकता आणि मानवतावादी दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन  केले.

अवयवदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही अनेक गरजू व्यक्तींना जीवनदान देता येते. त्यामुळे अवयवदानाबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शकांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना अवयवदानाची प्रक्रिया, त्याचे सामाजिक महत्त्व आणि अवयवदानामुळे मिळणारे जीवनदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी युवकांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन केले. युवकांच्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी व्हावा, तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून अवयवदानासारख्या सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. केवल कऱ्हाडे, प्रा. प्रवीण उपरे, प्रा. राहुल बोधे, प्रा. अनिल शेलेकर, उज्वला कापगते, डॉ. जी. एस. आगलावे, प्रा. भूषण वैद्य, डॉ. संदीप मांडवगडे व प्रा. गजानन घुमडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. जी. एस. आगलावे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!