Thursday, August 20, 2026
Homeवार्षिकोत्सवमूल येथील नवभारत विद्यालय,मध्ये "प्रेरणोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन" उत्साहात संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील नवभारत विद्यालय,मध्ये “प्रेरणोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन” उत्साहात संपन्न

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

 शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय एम सी व्ही सी मुल मध्ये नुकतेच प्रेरणोत्सव‘ या थीमवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, प्रा.महेश पानसे, प्रा.किसन वासाडे, प्रा.काटकर, प्रा.पुस्तोडे, प्रा.डॉ.कामडी, प्रा.संजय येरोजवार, प्रा.धोटे,प्रा.येलमुले, प्रा.बोलीवार, प्रा.पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष दलितमित्र माजी खासदार स्व.वि तु.नागपुरे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने झाली. विद्यार्थ्यांनीने गणनायकाय सुंदर नृत्य सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडले.
दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, नाटिका, एकपात्री प्रयोग सादर केले. सर्व स्पर्धेचे बक्षिस वितरण शिक्षकवृंदाच्या हस्ते करण्यात आले.
वार्षिक अहवालवाचन विद्यालयाचे शिक्षक  निलेश माथनकर यांनी केले.

प्राचार्य अशोक झाडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. माधुरी तलांडे, शिक्षक ताराचंद निमसरकर यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिक्षा बनकर, कु. किर्ती बनकर यांनी विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण पार पाडले. प्रा. कु. उगेमुगे यांनी शिक्षकांची सविस्तर माहिती देऊन सन्मान केला. उपस्थितांचे आभार कु. श्रद्धा कावळे हिने मानले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक प्रतिमा उमक, विकास मोडक,राजू बोढे, विजय निखारे,चैतन्य पुप्पलवार, भारत सलाम, पुनमचंद वाळके,सुनिल चौधरी, उदय चौधरी, कु. दिपा गोंगल आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विजय नागपुरे,मनीषा मडावी, संगीता टांगले, राहुल नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!