Saturday, August 22, 2026
Homeबीज टॅगकृषि महाविद्यालय मूल च्या कृषि कन्यांनी बीज टॅग (Seed Tag) विषयक जनजागृती...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालय मूल च्या कृषि कन्यांनी बीज टॅग (Seed Tag) विषयक जनजागृती केली

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

       पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित   कृषी महाविद्यालय, मूल च्या कृषी कन्याद्वारे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत बीज टॅग (Seed Tag) व बियाण्याची ओळख, गुणवत्ता नियंत्रण आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे शिंदेवाही तालुक्यातील  लोणवाही येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे, बीज टॅगवरील माहितीचे महत्त्व तसेच योग्य बियाणे निवडीबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

      हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेने तसेच कृषी वनस्पतिशास्त्र विषयाच्या डॉ. नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, कृषी विज्ञान केंद्र, शिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभारी डॉ. देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे तसेच विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रमास लाभ मिळाला.

     या जनजागृती कार्यक्रम प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या रावे विद्यार्थीनी कु.करुणा साहू,  कु.महारुख शेख,  कु.मोहिनी तिखट, कु. पल्लवी उरकुडे आणि कु. श्रद्धा वालोडे  यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना बीज टॅगवरील माहिती जसे की, बियाण्याची जात, उगवण क्षमता, शुद्धता, लॉट क्रमांक, उत्पादन तारीख व वैधता कालावधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाण्याचे शेती उत्पादन वाढविण्यातील महत्त्व यावरही भर देण्यात आला.

        शेतकऱ्यांना योग्य बियाण्याची निवड, बीज प्रक्रिया आणि बीज टॅग तपासूनच बियाणे खरेदी करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामुळे बियाण्याची गुणवत्ता सुनिश्चित होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते, असे स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बीज टॅगच्या योग्य वापरामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन मिळून आर्थिक लाभ वाढेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शाश्वत शेती विकासासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!