Friday, October 23, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025काँग्रेस ने निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखून सर्वानुमते निर्णय घेतला
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

काँग्रेस ने निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखून सर्वानुमते निर्णय घेतला

image_pdfimage_print
  • मूलमध्ये काँग्रेसमध्ये घसरगुंडी नव्हे, तर शिस्तबद्ध रणनीती

मूल :

      राजकीय वर्तुळांतून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असलेल्या बातमीच्या आधारे काँग्रेसमध्ये बंडाचे सूर असून नाराजी उसळली आहे व निष्ठावंत कार्यकर्ते दुर्लक्षित केल्याबद्दल एकतर्फी माहिती  पसरत आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नसून प्रत्यक्षात वस्तुस्थिती याच्या विरूध्द असल्याचे मत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

  • सौ.एकता समर्थ आणि प्रशांत समर्थ यांना उमेदवारी दिली — हे अचानक नव्हे, तर सर्वेक्षणावर आधारित

     काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पक्षाने गेल्या महिनाभरापासून गोपनीय सर्वे, जनमत, क्षेत्रनिहाय आढावा, स्थानिक घटकांचे विश्लेषण,जनतेची पसंती, यावर आधारित विस्तृत अहवाल तयार केला होता. या सर्वेक्षणात प्रशांत समर्थ यांचे नाव सर्वोच्च प्राधान्य क्रमात आल्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजेच उमेदवारी ही “नुकतेच आले म्हणून नाही”, तर “जिंकण्याची क्षमता सिद्ध केली म्हणून” काँग्रेसच्या जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून देण्यात आली. त्यामूळे निष्ठावान कार्यकर्ते दुखावलेले, या म्हणण्यात अर्थ नसुन — उलट कार्यकर्त्यांचेच मत पक्षाने मान्य केल्याने सर्व कार्यकर्ते समाधानी असल्याचा दावा तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केला आहे. आमच्या कार्यकर्त्यामध्ये या बाबत कुठलाही विरोध  नाही. या बाबत सांगतांना काँग्रेसच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्याने अनेक प्रभागांमधील कार्यकर्त्यांनी स्वतःच प्रशांत समर्थ यांचं नाव पुढे केल्याने समर्थ दाम्प्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करत उमेदवारी जाहीर केली. समर्थ यांची प्रतिमा, नागरिकांशी असलेला थेट संपर्क, आणि विविध सामाजिक उपक्रमातील सक्रिय सहभाग यामुळे ते विजयी उमेदवार म्हणून उभे राहत असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात निघाल्याने पराभवाच्या भितीपोटी बिनबुडाचे आरोप लावल्या जात असल्याचेही त्यांनी सांगीतले.

    पुढे सांगण्यात येते की, भाजपातून  काँग्रेस मध्ये येणारा प्रत्येक जण संधीसाधू नसतो, भाजपच्या कार्यशैलीला कंटाळून अनेक कार्यकर्ते विचार धारे ने काँग्रेसकडे परत येत असुन प्रशांत समर्थ यांच्या बाबतीतही हेच घडले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगीतले. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रांत केलेले काम पाहता, त्यांची उमेदवारी क्षमता आणि जनाधार यावरच आधारित असल्याचे स्पष्ट केले जात आहे.

  • काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व सांगते की—

  • “काँग्रेसमध्ये बंड फुटले असून कार्यकर्ते नाराज आहेत, पक्षात असंतोष आहे, हे सर्व खोटे असून ज्या प्रभागांत उमेदवारी जाहीर झाली, त्या प्रभागांत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात बैठक, संघटनात्मक तयारी, आणि घराघरात भेटी सुरू झाल्या आहेत. हे चित्र पूर्णपणे वेगळे असल्याने विरोधक नकारात्मक प्रचार करत असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत.

    मूल काँग्रेस एकजुटीत असून प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह सतत वाढत आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर—काँग्रेसच्या बैठका गजबजल्या, कार्यकर्ते अधिक सक्रिय झाले, महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसू लागली. म्हणजेच “काँग्रेस उफाळली” हा आरोप खरा आहे… पण उफाळली नाराजीने नाही — तर उत्साहाने! हे समजून घ्यावे.

  • मूल शहरात काँग्रेसची घसरगुंडी नव्हे ; तर मजबूत रणनीतीमुळे काँग्रेसची लढत अधिक भक्कम आहे, हे काँग्रेस सूत्रांनी  स्पष्ट केले आहे.

    आम्ही क्षमता, लोकप्रियता आणि जिंकण्याची ताकद पाहतो. त्यामुळे मूल मधील काँग्रेसची लढत यावेळी अधिक मजबूत आहे, हे स्पष्ट केले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!