मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
राजीव गांधी स्टडी सर्कल (RGSC) आणि राजीव गांधी फाउंडेशन (RGF) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरा भरा स्वराज – Rise & Act’ या विषयावर राष्ट्रीय केस स्टडी स्पर्धेचे आयोजन जवाहर भवन, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुल येथील गोपाल बल्लेवार यांची सुकन्या कु. मृणाली गोपाल बल्लेवार हिला तृतीय उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातून 147 केस स्टडी सादर केलेल्या विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 30 विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि सार्वजनिक धोरणांशी संबंधित विषयांवर आपले केस स्टडी जवाहर भवन, नवी दिल्ली येथे दिनांक 20/08/2026 ला सादर केले होते.
मृणाली बल्लेवार हिने “Addressing Industrial Air Pollution in Chandrapur: An Empirical Case Study of Emission Sources, Local Perceptions and Evidence-Based Recommendations” या विषयावर आपला अभ्यास सादर केला. या अभ्यासामध्ये चंद्रपूरमधील औद्योगिक वायुप्रदूषणाचे स्रोत, स्थानिक नागरिकांच्या समस्या व धारणा तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या पुराव्यावर आधारित उपाययोजनांचा अभ्यास करण्यात आला.





