Saturday, June 13, 2026
Homeबचावमूल उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन रूममध्ये नाग साप आढळला; उमेश सिंह झिरे यांच्या...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन रूममध्ये नाग साप आढळला; उमेश सिंह झिरे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मूल
आज दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास मूल उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन रूम परिसरात खळबळ उडाली. ऑपरेशन रूमच्या दरवाज्याच्या फटीतून एक साप जात असल्याचे एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. तात्काळ ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली असून संजीवन पर्यावरण संस्थेच्या सर्पमित्रांना याबाबत माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्पमित्र उमेश सिंग झिरे त्वरित रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी ऑपरेशन रूमची सखोल पाहणी केली असता ऑपरेशन रूममध्ये असलेल्या अॅल्युमिनियमच्या दरवाज्याच्या फ्रेममध्ये साप लपून बसल्याचे आढळून आले. योग्य खबरदारी घेत दरवाज्याची फ्रेम उघडून साप बाहेर काढण्यात आला. तपासणीदरम्यान तो साप नाग प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले.

रुग्ण, डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्पमित्र उमेश सिंग झिरे यांनी नाग सापाला अत्यंत सुरक्षित व शास्त्रीय पद्धतीने पकडले. त्यानंतर सापाला रुग्णालय परिसरातून दूर सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यात आले.

या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी सर्पमित्रांच्या तत्परता व कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णालय प्रशासनानेही वेळेवर योग्य पावले उचलल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता तज्ज्ञ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!